Nashik

रिपाईचे नेते महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांना पोलीस संरक्षण द्या-आंनदजी बावीस्कर.

रिपाईचे नेते महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांना पोलीस संरक्षण द्या-आंनदजी बावीस्कर.

*निळे निशाण सामाजिक संघटनेची राज्य सरकार कडे मागणी, आनंद बावीस्कर यांची मागणी. नाशिक शांताराम दुनबळे.

नाशिक= नाशिक येथे आज रोजी निळे निशाण सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने आज मुख्यमंत्री सचिवालय कक्ष नाशिक विभाग व विभागीय महसूल आयुक्त श्री. राधाकृष्ण गमे साहेब यांची संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.आनंदभाऊ बावीस्कर यांनी भेट घेऊन वरील मागणीचे निवेदन दिले.

निवेदनाचा आशय असा आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे उत्तर महाराष्ट्र नेते तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे हे रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून 35 ते 37 वर्षांपासून समाजसेवा करीत असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक संस्था संघटनांनी त्यांना शेकडो पुरस्कार दिले आहेत परंतु समाजसेवा करीत असताना काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून त्यांना धोका निर्माण झाल्याने त्यांना पोलीस संरक्षण मिळावे याकरिता रिपाईच्या विविध संघटनांच्या माध्यमातून दिनांक 10/2/2021 पासून संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्त्यांनी निवेदन दिले राज्यातील बऱ्याच जिल्हाधिकारी, तहसीलदार, महाराष्ट्राचे गृहमंत्री, राज्य सरकारला निवेदने दिले परंतु प्रशासनाने याची दखल न घेतल्याने 27/12/2021 रोजी भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीतील स्मशानभूमी येथे महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्यामध्ये त्यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली असून ह्यापुढे ही त्यांच्यावर व त्यांच्या कुटुबींयावर हल्ला होण्याची शक्यता नाकरता येत नाही त्यामुळे त्यांना तातडीने राज्य सरकारने पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी संघटनेनी राज्य सरकारकडे केली आहे.

याप्रसंगी निळे निशाण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.आनंदभाऊ बावीस्कर,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष (युवक) अशोकजी तायडे,युवा नेते आरबाज शेख,युवा अध्यक्ष रोहित बावीस्कर,विशाल भालेराव आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button