Latur

रेशनिंग वर पेट्रोल, डिझेल गॅस द्या-सामाजिक संघटनांची मोदींना मागणी

रेशनिंग वर पेट्रोल, डिझेल गॅस द्या-सामाजिक संघटनांची मोदींना मागणी

प्रशांत नेटके लातूर

लातूर : रेशनिंग वर प्रत्येकी व्यक्तीला 5 लिटर पेट्रोल, 5 लिटर डिझेल व कार्डावर प्रत्येकी 1 गॅस ची टाकी द्या अशी मागणी निलंगा उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या देशभरात पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, ते सर्वसामान्याना परवडणारे नाहीत ,त्यामुळेच ज्याप्रमाणे रेशनिंग वर पूर्वी रॉकेल दिल जात त्याच धर्तीवर प्रत्येक व्यक्तीला 5 लिटर पेट्रोल,5 लिटर डिझेल व प्रत्येकी कार्डला 1 गॅसची टाकी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
सदरील निवेदनावर टिपू सुलतान संघटना जिल्हाध्यक्ष मुजीब सौदागर, क्रांतिवीर लहुजी शक्ती संघटना जिल्हाध्यक्ष गोविंद सूर्यवंशी, सोमनाथ कदम जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र युवा शक्ती, सुनिल सूर्यवंशी वंचित बहुजन आघाडी, कुशाब कांबळे, दीपक पवार,महाराष्ट्र युवा शक्ती तालुकाध्यक्ष रेणापूर विनोद उपाडे,दिनेश शिंदे वंचित बहुजन आघाडी,गुणवंत रामतीर्थे,अँड घोलप किरण कुमार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button