Pune

मावळ तालुक्यातील आदिवासी लोकसंख्या तपशील द्या – ट्रायबल फोरम ची मागणी

मावळ तालुक्यातील आदिवासी लोकसंख्या तपशील द्या – ट्रायबल फोरम ची मागणी

दिलीप आंबवणे पुणे

पुणे : मावळ तालुक्यातील खालील गावांची एकूण लोकसंख्या आणि आदिवासी लोकसंख्या यांचा तपशील मिळणेबाबत तहसिलदार यांना ट्रायबल फोरम मावळ च्या वतीने निवेदन देण्यात आले.
खालील गावांची एकूण लोकसंख्या व आदिवासी लोकसंख्या यांचा तपशील अनुसूचित क्षेत्राकरीता आवश्यक आहे.
गावाचे नाव एकूण लोकसंख्या अनु.जमातींची लोकसंख्या सावळे, माळेगाव खुर्द, पिंपरी, माळेगाव बुद्रुक, कुणे, अनुसुटे, इंगळुन, किवळे, खांडी, कुसुर, कुसवली, वडेश्वर, माऊ, शिरदे, जांभवडी, उकसान, उ उडेवाडी, बेलज, करंजगाव, पाले या गावातील एकूण लोकसंख्या अनुसूचित जमातींची लोकसंख्या मिळावी.
त्यावेळी ट्रायबल फोरम पुणे विभागीय उपाध्यक्ष तथा सरपंच मारूती खामकर, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष विक्रम हेमाडे, सरपंच नामदेव गोंटे,सरपंच गुलाब गभाले, सरपंच राजेश कोकाटे, सरपंच आनंता पावशे मावळ तालुका अध्यक्ष कांताराम असवले, सचिव पप्पू वाजे, कार्याध्यक्ष संतोष हिले, अनिल गवारी, प्रसिध्दी प्रमुख मधूकर कोकाटे, , माजी उपसरपंच बाळासाहेब पावशे, मार्गदर्शक बजीरंग लोहकरे, सुरेश बगाड, हिरामन हेमाडे, नाणे मावळ अध्यक्ष किसन गवारी, उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button