kalamb

? Crime Diary…सोशल मीडियाच्या वादातून तरुणाचे अपहरण

सोशल मीडियाच्या वादातून तरुणाचे अपहरण

प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

सोशल मीडिया चा वापर जेवढा हितदायक आहे तेवढाच हानिकारक सुध्दा आहे याचाच प्रत्यय कळंब शहरातील एका तरुणाला आली आहे.

सोशल मीडियावरून कळंबच्या एका तरुणाचे मुंबईच्या एका महिलेशी ओळख झाली, त्यानंतर तिच्यासाठी तो मुंबईला गेला पण परत न आल्याने कुटुंबाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

मुंबई येथे राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेने कळंब येथील एका 17 वर्षीय तरुणाशी (नाव- गाव गोपनीय) इन्स्टाग्राम, व्हाट्सॲप द्वारे ओळख परिचय वाढवून त्यास मुंबई येथे बोलावले. यावर तो तरुण दि. 25.08.2020 रोजी कळंब येथून मुंबईस निघून गेला. त्याची पुन्हा काही माहिती कुटूंबीयांना मिळाली नाही. यावरुन त्या महिलेनेच त्याचे अपहरण केले आहे.

अशा मजकुराच्या अपहृत मुलाच्या वडलांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button