Kawathe Mahakal

गितांजली कोळीची कौस्तुकास्पद कामगिरी

गितांजली कोळीची कौस्तुकास्पद कामगिरी

राहुल खरात

कवठेमहांकाळ ; प्रतिनिधी /कवठेमहांकाळ बसस्थानकात फळविक्री करणाऱ्या गितांजली कोळीने दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे.ती पी व्ही पी कॉलेज कवठेमहांकाळ ची विद्यार्थीनी आहे.प्राकृती हेल्थ फौंडेशन संस्थापक अध्यक्षा समाजसेविका डॉ एकादशी लोंढे यांनी गितांजली कोळीचे पेढा भरवुन अभिनंदन केले.

तिचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.यावेळी ॲड श्री रमाकांत पाटील,श्री डी बी कोठावळे,पुजा माने,ज्योती हेळवी,आमसिद म्हेत्रे,स्वप्नील लोंढे उपस्थित होते.गितांजलीचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Back to top button