Bid

आरटीओ अधिकारी प्रवीण भोसले हे शासनाच्या नियमानुसारच कारवाई करतात कर्तव्याशी एकनिष्ठ असणाऱ्या अधिकाऱ्याला बदनाम करण्याचा प्रयत्न

आरटीओ अधिकारी प्रवीण भोसले हे शासनाच्या नियमानुसारच कारवाई करतात कर्तव्याशी एकनिष्ठ असणाऱ्या अधिकाऱ्याला बदनाम करण्याचा प्रयत्न

नितीन जोगदंड बीड

बीड : बीड आरटीओ अधिकाऱ्यांवर काही एजंटांकडून कामे करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. आणि जर कामे केली नाही तर खोट्या बातम्या देऊन बदनामी करण्याचे प्रकार घडत आहेत. बीड आरटीओ कार्यालयातील प्रवीण भोसले नावाचे अधिकारी मागील दोन वर्षांपासून आपली ड्युटी इमाने इतबारे करत आहेत. त्यांना कागदपत्रात कसलीही तडजोड चालत नाही. परंतु काही एजंटकडून कामे करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. यासंदर्भात माहिती घेतली असता प्रवीण भोसले हे सहकार्याच्या भावनेने काम करत असल्याचे कळाले.

मात्र काही लोकांकडून प्रवीण भोसले हे वाहन चालकांकडून दमदाटी करून आर्थिक लूट करत असल्याचा आरोप केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून इन्स्पेक्टर भोसले हे रस्त्यावर उभे राहून वाहन आणि कागदपत्रे तपासण्याचे काम करत आहेत.
भोसले यांनी शासनाच्या नियमानुसारच वाहनांवर दंड वसूल करून जानेवारी महिन्यात शासनाला जास्तीत जास्त महसूल दिला आहे. तसेच भरारी पथक, रस्ता सुरक्षा, वाहन तपासणी, अपघात तपासणी चे कामे या जानेवारी महिन्यात करीत आहेत. ते दिवसांतून १४ ते १५ तास ड्युटी करत आहेत. मात्र अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यावर खोटे आरोप लावून वृत्तपत्रातून बदनामी केली जात आहे.

त्यादरम्यान येणाऱ्या- जाणाऱ्या वाहन चालकांकडून कागदपत्रे मागवून घेतात उदा. रोड टॅक्स पावती, इन्शुरन्स, परमिट, फिटनेस, पीयूसी अशा प्रकारच्या कागदपत्राची मागणी करून पाहणी करतात आणि जर त्यात काही कमतरता असली तरच ते त्यासंदर्भात दंड लिहून देतात. नंतर तो दंड ऑनलाईन किंवा आरटीओ कार्यालयात भरून आणा असे सांगतात. त्यामुळे त्यांच्याकडून आर्थिक लूट करीत असल्याचे आरोप खोटे असल्याचे दिसून आले. ज्यावेळी प्रवीण भोसले हे आरटीओ कार्यालयात लायसन्स विभागात ड्युटी करत असतात त्यावेळेस देखील त्यांच्याकडून लायसन्स धारकांना सहकार्य करत असल्याची माहिती समोर आली आहे. ते कधी ही वाहन धारकांना आणि लायसन्स धारकांना अरेरावीची भाषा वापरत नाहीत किंवा त्यांच्याकडून पैशांची मागणी करत नाहीत. उलट आष्टी तालुक्यातून येणाऱ्या लायसन धारकांना जाण्यासाठी पैसे नसतील तर त्यांनी अनेक वेळा आर्थिक सहाय्य करतात. त्यांना घरच्या व्यक्ती समजून आपुलकीने विचारपूस करतात. एखाद्या लायसन धारकाने कागदपत्रांच्या सत्यप्रती (ओरिजनल) आणल्या नसतील तर मोबाईल वर फोटो मागवण्यास सांगतात मात्र त्यांना परत पाठवत नाहीत. आरटीओ कार्यालयात सर्वांसोबत हसत, मिळून मिसळून काम करणारे एकमेव व्यक्ती म्हणजे इन्स्पेक्टर प्रवीण भोसले यांचं नावं घेतले जाते. त्यांच्याकडून वाहन धारकांना कधीच नीट बोलत नसल्याचा आरोप साफ खोटा आहे. कारण त्यांच्यावतीने वाहन धारकांना अधिकाधिक सहकार्य कसे करता येईल यासाठी प्रयत्नशील असतात. उलट एजंटांच्या बाबतीत त्यांची भूमिका नकारात्मक असल्याने त्यांच्या वर असे खोटे आरोप केले जात आहेत. त्यामुळे प्रवीण भोसले हे हुकुमशाह नसून वाहनधारकांचे हित जपणारा आणि त्यांना तळमळीने सहकार्य करणारा अधिकारी आहे.
विशेष म्हणजे कार्यालयात मा. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नसतानाही जे कामे कायद्या नुसार किंवा नियमानुसार करता येतील त्याकामात लोकांची कसल्या ही प्रकारची गैरसोय होऊ न देता भोसले हे पुढाकार घेऊन वाहनधारकांना त्रास होऊ न देता कामे करून देतात.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button