Maharashtra

ग्रा.पं. मासिक सभेत घमासान..महिला सरपंचास सदस्याने केली जातीवाचक शिवीगाळ ; ऍट्रासिटी चा गुन्हा दाखल

ग्रा.पं. मासिक सभेत घमासान..महिला सरपंचास सदस्याने केली जातीवाचक शिवीगाळ ; ऍट्रासिटी चा गुन्हा दाखल

अकोला प्रतिनिधी:- विलास धोंगडे

पातूर : ग्रामपंचायत च्या मासिक सभेत एकाच पॅनलच्या सदस्यांत ठरावावरून शाब्दिक चकमक होऊन त्याचे पर्यावसान भांडणात झाले असून एका सदस्याने महिला सरपंचास जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे.
पातूर तालुक्यातील शिर्ला ग्रामपंचायत येथे दि. 30/11/2021 रोजी होऊ घातलेल्या मासिक सभेत एका विषय ठरावावरून वाद निर्माण झाला असता एका सदस्याने महिला सरपंचास जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला आहे.
सदर प्रकरणाची शिर्ला ग्रामपंचायतच्या महिला सरपंचानी पातूर पोलिसांत तक्रार दिली आहे.सरपंचाच्या तक्रारीवरून पातूर पोलिसांनी ग्रामपंचायत सदस्य सागर कढोणे याचे विरोधात भादंसं 1830 नुसार कलम 354,354 अ, 504,506 अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 कलम 3(1)(s), 3(1)(w)(i), 3(1)(w)(ii), 3(2)(va) नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील कार्यवाही पातूर पोलीस करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button