sawada

सावदा येथील सोमवारगिरी मढीस तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवा । राजेश वानखेडे यांची मागणी, पालकमंत्र्यानकडून त्वरीत मंजूरीचे आश्वासन

सावदा येथील सोमवारगिरी मढीस तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवा । राजेश वानखेडे यांची मागणी, पालकमंत्र्यानकडून त्वरीत मंजूरीचे आश्वासन

सावदा : सावदा येथील पुरातन असलेले भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तसेच स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यलठ्याचे एक केंद्र असलेल्या येथील सोमवारगिरी मढीस तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळून तेथे विकासकामे व्हावी या मागणीसाठी येथील माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे यांनी पालकमंत्री जळगाव ना. गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले व येथे पन्नास लाखाचा निधी मिळवा अशी मागणी केली यावेळी पालकमंत्री यांनी देखील लवकरच सदर कामाची मंजूरी मिळण्याचे आश्वासन दिले,
येथील बखतपुरी गोसावी समाधी ट्रस्ट, सोमवारगिरी मढी पुरातन मंदिरा मध्ये दरवर्षी जयंती महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो, सोबत यात्रा महोत्सव, व विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात या जागृत देवस्थानावर श्रद्बा असलेले लोक पंचक्रोशीत नव्हे तर लांब लाबुन लोक दर्शासाठी येत असतात, मात्र येथे असलेल्या सोयीसुविधा तोडकया पड़त असल्याने नव्याने येथे तीर्थक्षेत्र विकासा अंतर्गत सोईसुविधा करून मिळाव्या अशी मागणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली असून यासाठी पन्नास लाख रूपयांचा निधी मिळावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे यावर नगरसेवक राजेश वानखेडे यांचेसह नगरसेवक किशोर बेंडाळे, नगरसेविका मीनाक्षी कोल्हे, अतुल नेमाडे, महेश भारंबे, कुशल जावळे, किरण पाटील, हरीसिंग परदेशी आदिनच्या स्वाक्ष-या आहेत, तर पालकमंत्री यांनी देखील सदर काम त्वरीत मंजूर करण्याचे आश्वासन यावेळी दिले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button