Amalner

युवा कल्याण प्रतिष्ठान तर्फे जनरल नॉलेज स्पर्धा…

युवा कल्याण प्रतिष्ठान तर्फे जनरल नॉलेज स्पर्धा…

अमळनेर येथील युवा कल्याण प्रतिष्ठान तर्फे जनरल नॉलेज स्पर्धा परीक्षेचे आयोजन २९ ऑगस्ट २०२१ रोजी जी एस हायस्कुल,अमळनेर येथे करण्यात आलेले असून स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.

युवा कल्याण प्रतिष्ठान तर्फे सामाजिक व राजकीय चळवळी कार्यरत असणारे जेष्ठ कार्यकर्ते प्रा अशोक पवार यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने जनरल नॉलेज स्पर्धा दोन गटात आयोजित करण्यात आली आहे. इयता १० वी ते १२ वी ,वय १६ ते १८वर्षे वयोगटासाठी,दुसरा गट: FY, SY, TY (सर्व शाखा) १९ ते २५ वर्षे वयोगटासाठी असेल.
स्पर्धेसाठी नियम पुढीलप्रमाणे आहेत.नोंदणी
दिनांक २८ऑगस्ट २०२१ पर्यंत केली जाईल.कोणतेही नोंदणी शुल्क नाही.प्रत्येक गटासाठी स्वतंत्र १०० प्रश्नांची प्रश्नपत्रिका असेल.प्रत्येक गटातील पहिल्या पाच स्पर्धकांना आकर्षक बक्षिस देण्यात येईल. आणि सर्व सहभागी स्पर्धक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
दिनांक ४ सप्टेंबर २०२१ रोजी बक्षिस वितरण समारंभ होईल.स्पर्धा परीक्षांना विचारल्या जाणाऱ्या धर्तीवर बहूपर्यायी प्रश्न असतील.उत्तर पत्रिका पुरवली जाईल.स्पर्धा परीक्षा दिनांक २९ ऑगस्ट २०२१ रोजी जी एस हायस्कुल,अमळनेर येथे सकाळी १० ते ११.३० या वेळेत होईल.नाव नोंदणी करतांना शिक्षण घेत असलेल्या संस्थेचे/शाळा/महाविद्यालयाचे ओळख पत्राची आणि आधार कार्डाची झेरॉक्स प्रत जोडावी. स्पर्धकांनी परीक्षा केंद्रावर ३० मिनिटे आधी म्हणजे सकाळी ९.३०वा उपस्थित राहावे. उशिरा आलेल्यांना प्रवेश मिळणार नाही.नोंदणी न केलेल्या आणि ऐनवेळी परीक्षा केंद्रावर आलेल्यांना स्पर्धा परीक्षेत सहभागी होता येणार नाही.परीक्षा केंद्रावर येतांना आधार कार्डाची झेरॉक्स सोबत आणावी.
स्पर्धा परीक्षा नाव नोंदणी ठिकाण प्रा अशोक पवार यांचे निवासस्थान,२८ विठ्ठल नगर, पिंपळे रोड, अमळनेर. यतीन पवार,संदीप जैन ,मयूर फरसाण, लालबाग शॉपिंग सेंटर, दुकान क्र १५,अमळनेर येथे करावयाची आहे.
स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन गौतम मोरे,बन्सीलाल भागवत,सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे आदींनीसह युवा कल्याण प्रतिष्ठान च्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button