Aurangabad

व्हेंटिलिटरच्या नावाखाली डब्बे पाठवले, कंपनीवर गुन्हे दाखल करा – खा. इम्तियाज जलील

व्हेंटिलिटरच्या नावाखाली डब्बे पाठवले, कंपनीवर गुन्हे दाखल करा – खा. इम्तियाज जलील
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : पीएम केअर फंडातून औंरगाबादला मिळालेले दीडशे व्हेंटिलेटर सर्वच खराब आणि बिनकामाचे निघाले आहे. घाटीतील तज्ञ डाॅक्टारांच्या टीमने देखील यावर शिक्कामोर्तब केले आहे.
केंद्राने व्हेंटिलेटरच्या नावावर डब्बे पाठवेलेत का? असा संतप्त सवाल करत संबंधित कंपनी, एजन्सीवर राज्य सरकारने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली.
पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या खरीप हंगाम पुर्व आढावा बैठकीत पीएम केअरमधून मिळालेल्या व्हेंटिलेटरचा मुद्दा चांगलाच गाजला.
घाटी रुग्णालय व मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात पाठवलेले सर्वच व्हेंटिलेटर खराब आणि वापरण्यास योग्य नसल्याचे सिद्ध झाले आहे.
त्यामुळे ते तयार करणाऱ्या कंपनीवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी औरंगाबाद जिल्हयाचे खा. इम्तियाज जलील यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button