Pune

भक्तिमय वातावरणात पर्यावरणपूरक सजावट करून पाटील कुटुंबियांचे गौरीपूजन

भक्तिमय वातावरणात पर्यावरणपूरक सजावट करून पाटील कुटुंबियांचे गौरीपूजन

दत्ता पारेकर पुणे

पुणे : इंदापूर येथील भाग्यश्री निवासस्थानी राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कुटुंबियांनी गौरी पूजनानिमित्त पर्यावरणपूरक सजावटींसह आकर्षक देखावा साकारला होता. पाटील कुटुंबियांनी मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीभावाने पारंपारिक पद्धतीने गौरीची विधिवत पूजा केली. हळदी कुंकवाचे लेणं घेऊन गौरी आली… गौरी आली.. असे म्हणत गौरीचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
इंदापूर तालुका जिजाऊ फेडरेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील तसेच जिल्हा परिषद सदस्या कु.अंकिता पाटील यांनी गौराईची पर्यावरणपूरक सजावट केली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील यांनी गौराईची विधिवत पूजा केली.
भाग्यश्री पाटील आणि अंकिता पाटील दरवर्षी मोठ्या उत्साहात गौराईची सजावट करीत असतात. गौराईसाठी विविध प्रतिकृतींचे सादरीकरण करीत आपला आनंद द्वीगुणित करीत असतात.
देशावरील कोरोनाचे संकट दूर करण्याची तसेच सर्वांचे जीवन सुजलाम सुफलाम होण्याची प्रार्थना यावेळी हर्षवर्धन पाटील आणि भाग्यश्री पाटील यांनी केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button