सांगोला

डोंगर पाचेगाव येथील वादळी वारे व पावसाने पडलेल्या घरांची ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी केली पाहणी….

डोंगर पाचेगाव येथील वादळी वारे व पावसाने पडलेल्या घरांची ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी केली पाहणी….

राहुल खरात

सांगोला तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असणाऱ्या डोंगर पाचेगाव या भागात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले आहे.या भागातील शेती पिके,फळबागा व नागरिकांच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे अनेकांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. महसूल प्रशासनाने पंचनामे करण्याचे त्वरित करावे अशी मागणी तरी,मा.#आम. #गणपतराव #देशमुख यांनी केली.यांनी नुकसान झालेल्या डोंगराकडे राहणाऱ्या पाचेगाव येथील शेतकरी ज्ञानू खरात यांच्या घराची पडझड झालेली देण्यासाठी काल सोमवारी दि. ४ नोव्हेंबर रोजी डोंगर पाचेगाव येथे भेट देऊन भागाची पाहणी केली.शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जाईल असा विश्वास दिला. तसेच कोळा येथील ग्रामस्थांची चर्चा केली. शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या व्यथा आणि झालेल्या नुकसानाची माहिती घेतली.यावेळी ऍड सचिन देशमुख #जगदीश #कुलकर्णी,युवानेते कुंडलिक आलदर,माजी सरपंच बाबासाहेब कांबळे युवा नेते अशोक खरात जगदीश कुलकर्णी, देवाप्पा इरकर, जालिंदर मदने संभाजी खरात (शेठ,)गोविंद महानवर निवास माने शंकर गिड्डे विठ्ठल खरात धुळा काबुगडे खरात बिरा घागरे यांच्यासह पाचेगाव परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Back to top button