Khirdi

खिर्डी येथे कोरोना नियमांचं पालन करत गणरायाचं उत्साहात आगमन

खिर्डी येथे कोरोना नियमांचं पालन करत गणरायाचं उत्साहात आगमन

प्रवीण शेलोडे खिर्डी

खिर्डी : ना गुलालांची उधळण ना ढोलताशाचा दणदणाट तरीही गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा देत विघ्नहर्ता गणरायाचं आगमन खिर्डीखु येथील जय गणेश मित्र मंडळाकडून उत्साहपूर्ण वातावरणात प्रतिष्ठापना केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी उत्सवावर कडक निर्बंध होते .मात्र यंदा कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने राज्य सरकारने नियम शिथिल करत उत्सव साधेपणाने साजरा करण्यास परवानगी दिली आहे. याचाच एक भाग म्हणून जय गणेश मित्र मंडळ खिर्डी येथे कोरोनाचे नियम पाळत टाळाच्या गजरात गणरायाचे स्वागत करण्यात आले.त्यावेळी गणेश बोरणारे,आकाश चौधरी,दिपक कोळी,निलेश कोळी, राहुल बारी,प्रणव महाजन, उमाकांत महाजन निलेश बारी इ पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button