Surgana

सुरगाणा तालुक्यातील जी ग्रामपंचायत १००% लसीकरण करणार-आमदार नितीन पवार

सुरगाणा तालुक्यातील जी ग्रामपंचायत १००% लसीकरण करणार-आमदार नितीन पवार
विजय कानडे सुरगाणा
सुरगाणा : त्या ग्रामपंचायत हद्दीत १५ लाख विकास कामांसाठी देणार.
आमदार नितीन पवार यांची आदिवासी भागात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करीता अनोखी जनजागृती…
आज तौक्ते चक्रीवादळामुळे सुरगाणा तालुक्यातील नुकसान ग्रस्त विविध गावांमध्ये कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन अर्जुन पवार यांनी प्रशासकीय अधिकारी यांचे समवेत पाहणी दौरीटा केला. सदर दौ-याप्रसंगी आमदार पवार यांनी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या घरांचे तसेच आंबा फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याना तात्काळ पंचनामे करुन शासन स्तरावरून आर्थिक मदत देण्याबाबत प्रशासकीय यंत्रणेस सुचना केल्या.
यावेळी,
सुकतळे, हस्ते, सांबरखल,बरडा,
दाबाडमाळ ,रोंगाणे,म्हैसमाळ, शिरीषपाडा,
दांडीचीबारी, वडपाडा, माणी, खडकमाळ, पळसन, म्हैसखडक,देविपाडा, उंबरठान,मांधा पांगारणे, गोंदूने इत्यादी गावांमध्ये भेट दिली.
या दौ-यात विशेषत: आदिवासी बहुल ग्रामीण भागातील आदिवासी नागरिक कोरोना प्रतिबंधात्मक लस घेत नसुन लसीकरणाबाबत अनेत गैरसमज पसरल्याने आमदार पवार यांनी सर्व आदिवासी बांधवांना लसीकरणाचे महत्व पटवुन सांगितले व मी स्वतः लस घेतली आहे आणि तुमच्याकडे समोर जिवंत उभी आहे अशी भावनिक साद देखील घातली. या नुकसान ग्रस्त पाहणी दौ-याचे विशेष आकर्षण म्हणजे नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करतेवेळी आमदार पवार यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण बाबत जनजागृती करतेवेळी अनोखी शक्कल लढवत *सुरगाणा तालुक्यातील जी ग्रामपंचायत हद्दीत शासनाच्या पात्रता निकषानुसार १००% लसीकरण करणार त्या ग्रामपंचायत हद्दीत विकास कामांसाठी अतिरिक्त १५ लाख निधी उपलब्ध करून देणार असल्याचे भाकीत यावेळी केले.
सदर दौ-याप्रसंगी तहसीलदार किशोर मराठे गटविकास अधिकारी श्री. पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.रणवीर, तालुका कृषी अधिकारी श्री.रहाणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक तालुकाध्यक्ष राजेंद्र पवार, प्रमुख पदाधिकारी व नुकसान ग्रस्त भागातील स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button