Nashik

मेजर नारायण मढवई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

मेजर नारायण मढवई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

चिचोंडी येथे अंत्यसंस्काराला नागरिकांची प्रचंड गर्दी

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक=येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक येथील भूमिपुत्र ४२ आरमाड रेजिमेंटचे जवान मेजर नारायण निवृत्ती मढवई हे कर्तव्यावर असताना हिसार- हरियाणा येथे त्यांना वीरमरण आले त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी तीन वाजता शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले मढवई यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले . ‘ अमर रहे अमर रहे , नारायण मढवई अमर रहे ‘ अशा घोषणा देण्यात आल्या . मेजर नारायण मढवई यांच्या अंत्यविधीला नागरिकांची प्रचंड गर्दी होती . काल दुपारी १ वाजता वीरमरण आलेले नारायण मढवई यांचे पार्थिव पुण्याहून येवला व नंतर रायतेमार्गे चिचोंडी गावात येताच ‘ अमर रहे अमर रहे . नारायण मढवई अमर रहे । ‘ जब तक सूरज चांद रहेगा नारायण तेरा नाम रहेगा , भारतमाता की जय , वंदे मातरम् ‘ अशा घोषणा देत पार्थिवाला खांदा देत चिचोंडीकरांचे आसू अनावर झाले . गावात आज प्रत्येकाने शहीद जवान मेजर नारायण मढवई यांच्या पार्थिवाचे घरापुढे सडारांगोळी काढून स्वागत केले . याच वेळी गावातील सर्वधर्मसमभावाचे देखील दर्शन झाले गाव , वाडी – वस्ती , रस्ते रंगोळ्यांनी सजले होते . सगळ्या कुटुंबांनी घरापुढे रस्त्यावर येत रांगोळी काढून भूमिपुत्राचे जड़ अंतकरणाने स्वागत केले . दुपारी दोन तास देशभक्तीपर गीतांद्वारे भव्य मिरवणूक पार पडली शहीद जवान जवान नारायण मढवई यांचे पार्थिव घरापुढे नेताच प्रत्येकाचे डोळे पाणावले . घरातील सदस्यांनी वीर जवान नारायण मढवई यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले .. वडील निवृत्ती मढवई , आई ताराबाई , चुलते साहेबराव मढवई , सोपान मढवई बंधू बाळासाहेब भाऊसाहेब पत्नी सोनाली मढवई , मुलगा कृष्णा , हरीश , बहीण शीला बोरणारे , मेहुणे संपत बोरणारे ,सासरे मच्छिंद्र बावके आदींसह कुटुंबातील इतर सदस्यांनी मेजर मढवई यांचे अंतिम दर्शन घेतले यावेळी शासनाच्या वतीने तहसीलदार प्रमोद हिले , तर पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या वतीने बाळासाहेब लोखंडे यांनी वीर जवान नारायण मढवई यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले . उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे , येवला तालुका आजी – माजी सैनिक संघटना सैनिक कल्याण बोर्ड नाशिक ४२ आरमार रेजिमेंटचे सुभेदार एस . बी . काळे , भरत निमसे अत्रिदल सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नवनाथ पगार , नांदगावचे माजी सैनिक संघटना सुभेदार बाजीराव मोहिते , मेजर धनराज बागूल नायक सुभेदार सावता बाबू काळे , तुषार खताळ , तसेच शिवसेना नेते संभाजी पवार , जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर , येवला पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड , माजी सभापती प्रकाश वाघ , सामाजिक कार्यकर्ते अल्केश कासलीवाल , सरपंच रवींद्र गुंजाळ , पाटोद्याचे सरपंच प्रताप पाचपुते , पोलीस निरीक्षक अनिल भवारी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील पशुवैद्यकीय संघटनेचे प्रदीप दाणे राष्ट्र सेवा दलाचे राज्य कार्याध्यक्ष अर्जुन कोकाटे , नगरसेवक प्रवीण गायकवाड बाजार समितीचे प्रशासक वसंत पवार आदींनी वीर जवान नारायण मढवई यांच्या पार्थिवास पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली . शासकीय इतमामात झालेल्या या अंत्यविधीत पोलिसांनी हवेत रायफलद्वारे फैरी झाडून पार्थिवास मानवंदना दिली . चबुतऱ्याभोवती काढलेली भव्य रांगोळी , फुलांची रोषणाई , देशभक्तीपर गीते , प्रत्येक चौकात लावलेले बॅनर यामुळे युवकांनी सर्व क्षण मोबाइलमध्ये कैद केले . गोरखनाथ खराटे , उत्तम बंड , कानिफनाथ मढवई , मिलिंद गुंजाळ यांनी सूत्रसंचालन केले यावेळी येवला शहर व तालुक्यातील पंचक्रोशीतील नागरिक सह चिचोंडी ग्रामस्थ अंत्ययात्रेला उपस्थित होते .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button