Maharashtra

आरोग्य तपासणी केंद्र सर्व प्रभागात सुरू करण्याची मागणी

आरोग्य तपासणी केंद्र सर्व प्रभागात सुरू करण्याची मागणी

चांदवड उदय वायकोळे

चांदवड तालुक्यात काल एकूण 25 लोक कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने शहर व परिसरात मात्र खळबळ उडाली आहे. चांदवड नगरपरिषदचे नगरसेवक नवनाथ आहेर,अल्ताफ तांबोळी यांनी प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांना निवेदन दिले की कोविड 19 च्या महामारीमुळे काही डॉक्टरांनी रुग्ण तपासणी बंद ठेवली आहे,त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.साधारण ताप,खोकला असेल तरी नागरिक घाबरून जात आहेत.तरी चांदवड नगरपरिषद हद्दीतील प्रभाग 1 ते 17 मध्ये महिन्यातून 2 वेळा आरोग्य तपासणी केंद्र सुरू करावे जेणेकरून छोट्या आजारांना उपचार उपलब्ध होऊ शकतील.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button