Bollywood

सोनपरी तील फ्रुटी झाली मोठी..!ह्या चित्रपटातून येत आहे भेटीला..!

सोनपरी तील फ्रुटी झाली मोठी..!ह्या चित्रपटातून येत आहे भेटीला..!

मुंबई टेलिव्हिजन वरील सोनपरी ही मालिका खूप गाजली होती. या मालिकेत सोनपरी आणि फ्रुटीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. मालिका बंद होऊन अनेक वर्षे झाली आहे पण तरीही या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.या मालिकेत फ्रुटीची भूमिका अभिनेत्री तन्वी हेगडेने साकारली होती. तन्वी मोठी झाली असून लवकरच ती एका मराठी चित्रपटात दिसणार आहे.

अभिनेत्री तन्वी हेगडे मोजक्या मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले. पण तिने साकारलेल्या व्यक्तिरेखा रसिकांच्या लक्षात आहेत.आता अलिप्त या मराठी चित्रपटातुन तन्वीने पुन्हा भेटीला येत आहे.२९ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होईल. अनिकेत विनायक कारंजकर हे अलिप्त या चित्रपटाचे निर्माते आहेत तर मनोज सुधाकर येरुणकर दिग्दर्शक आहेत. स्वप्नील प्रकाश जाधव तन्वीसोबत मुख्य भूमिकेत आहेत.

जान की कसम गज गामिनी राहुल, पिता, विरुद्ध, वाह! लाईफ हो तो ऐसी, चल चले, धुरंधर भाटवडेकर अथांग, शिवा हे चित्रपट तर शाका लाका बूम बूम आणि सोन परी या मालिकांमध्ये तिने अभिनय केला आहे.
स्वप्नील आणि तन्वीसोबत या चित्रपटात शरयू सोनवणे, भूषण घाडी, सुनील देव, सुशांत शेलार आदी कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button