Rawer

पर्यावरणाच्या दृष्टीने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविणे गरजेचे-आ.शिरीष चौधरी

पर्यावरणाच्या दृष्टीने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविणे गरजेचे-आ.शिरीष चौधरी

निंभोरा – संदिप को ळी
पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती व प्रदूषणाच्या समस्येमुळे भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराची आवश्यकता असून त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने व आर्थिक दृष्टीने फायदेशीर असल्याचे मत निंभोरा येथील कार्यक्रमात आमदार शिरीष चौधरी यांनी व्यक्त केले.
निंभोरा येथील सहकारातील ज्येष्ठ नेते प्रल्हाद बोंडे यांच्या साई इ-मोटर्स च्या उदघाटनाप्रसंगी आ चौधरी बोलत होते.
याईळी सिका मोटर्स चे एम डी श्रीराम पाटील,जिल्हा ड्रीप असोसिशनचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील,प्रल्हाद बोंडे,दीपक कपूरे, माजी सरपंच डिगंबर चौधरी,सरपंच सचिन महाले,निंभोरा पोलीस ठाण्याचे सपोनि स्वप्नील उनवणे,प्रा संजय मोरे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी निंभोरा येथील परिसरातील ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित होते.यावेळी श्रीराम पाटील,डॉ एस डी चौधरी,सपोनि स्वप्नील उनवणे,प्रा संजय मोरे आदींनी यावेळी इलेक्ट्रिक मोटरसायकलबद्दल माहिती दिली तसेच पर्यावरणपूरक व आरटीओ पासिंग ची आवश्यकता नसल्याचे ही यावेळी सिका मोटर्सच्या वतीने श्रीराम पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील कोंडे यांनी तर आभारप्रदर्शन विवेक बोंडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोशन बोंडे,गुणवंत भंगाळे,भूषण बोंडे,मोहन बोंडे आदींनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button