Pandharpur

स्टेट बँकेच्या कॅशियर खिडकीतून चोरट्यांनी दाखवली हात की सफाई

स्टेट बँकेच्या कॅशियर खिडकीतून चोरट्यांनी दाखवली हात की सफाई

प्रतिनिधी
रफिक आतार

पंढरपूर : पंढरपूर येथील लक्ष्मी रोडवर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेतून दुपारी पावणेचारच्या सुमारास स्टेट बँकेच्या बाहेर असणाऱ्या रोखपालाच्या खिडकीतून दोन चोरट्यांनी कॅश काउंटर च्या कप्प्यात हात घालून सुमारे सव्वा तीन लाख रुपयांची रोकडची चोरी केली. ही चोरी करताना बँकेत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये संबंधित चोरटे कैद झाले आहे. या घटनेची समजलेली अधिक माहिती अशी स्टेट बँक ऑफ इंडिया पंढरपूर शाखेमध्ये बाहेर असलेल्या एटीएम च्या शेजारी रोखपालाचे काउंटर आहे. या काउंटर मध्ये असणारे रोखपाल पांडुरंग संतू राऊत (वय 55) राहणार सांगोला यांची नेमणूक असून त्याठिकाणी पन्नास हजार रुपये पर्यंत ची रक्कम खातेदारांना देण्यात येते. शुक्रवार २६ नोव्हेंबर रोजी स्टेट बँकेचा नियमित शिपाई त्याठिकाणी नसल्याने राऊत हे एकटेच रोखपालची जबाबदारी स्वीकारत होते. रक्कम देणे- घेणे याच बरोबर आत मध्ये हि त्यांनाच जा-ये करावी लागत होती. दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास रोखपाल राऊत कॅश काऊंटरवरुन वरिष्ठांची सह्या आणि परवानगी घेण्याकरता जात होते.
दरम्यान ते बँकेच्या आतील बाजूस धनादेश देण्यासाठी गेले असता याच दरम्यान त्या ठिकाणी रोखपाल काउंटरच्या बाहेर उभे असलेले दोन व्यक्ती ज्यांनी मास्क घातला होता त्यांनी नजर चुकवत रोखपालच्या केबिन मधील कॅश काऊंटरच्या कप्प्यात हात घालून सुमारे पाचशे,शंभर, व पन्नास रुपये दाराच्या नोटांचे बंडल चोरी केली. एकूण ३ लाख २५ हजार रुपयांची चोरी या चोरांनी केली असून हा सर्व प्रकार त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे. या घटनेची फिर्याद पांडुरंग संतू राऊत यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली असून पंढरपूर शहर पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button