चंद्रपूर

क्रीडा महोत्सवातून विद्यार्थी घडतात… प.स. सदस्या भावना बावनकर

क्रीडा महोत्सवातून विद्यार्थी घडतात…
प.स. सदस्या भावना बावनकर

ज्ञानेश्वर जुमनाके
शंकरपूर….
विध्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी क्रीडामहोत्सव एक माध्यम आहे या माध्यमाचा उपयोग विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे अश्या क्रीडा महोत्सवातून विध्यार्थी घडत असतात त्यामुळे शिक्षकांनी आपल्या शाळेतील प्रत्यक विद्यार्थ्याला यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे, तसेच विद्यार्थ्यांनी कलागुणांची शिस्त आत्मसात करून आपल्या शैक्षणिक जीवन विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सर्वांगीण वापर करावा जेणेकरून एक आदर्श व्यक्तिमत्व शिक्षण होईल शैक्षणिक कलेच्या माध्यमातून विकास होतो त्यामुळे शाळेतील खेळ होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य भावना बावनकर यांनी केले आहे ….
जांभुळघाट येथे आयोजित बीट स्तरीय शालेय बालक्रीडा स्पर्धा तथा सांस्कृतिक संमेलन मध्ये प्रमुख अतिथी स्थानावरून बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ममता डुकरे जिल्हा परिषद सदस्या, उद्घाटक विद्या चौधरी सभापती पंचायत समिती चिमूर, प्रमुख पाहुणे संजय पुरी गटविकास अधिकारी प.स.चिमूर, किशोर पिसे गटशिक्षणाधिकारी प.स.चिमूर, सरपंचा वैशाली कन्नाके, केंद्रप्रमुख कांबळी सर , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष चव्हाण, रमेश भजभुजे, उमाजी निवटे, भाऊजी टेकाम ,राजू साठोणे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
विविध जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थी नि पाहुण्याच्या समोर कवायत व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर पिसे, संचालन वैशाली डवले मॅडम, यांनी आभार राजेंद्र शेंडे सर केले….

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button