Amalner

श्री.अंबरीष महाराज टेकडी येथे वारंवार आग, वृक्ष तोड, चराई करून पर्यावरणाचे नुकसान संदर्भात बंदोबस्त करण्याविषयी निवेदन

श्री.अंबरीष महाराज टेकडी येथे वारंवार आग, वृक्ष तोड, चराई
करून पर्यावरणाचे नुकसान संदर्भात बंदोबस्त करण्याविषयी निवेदन

अमळनेर सदर संस्थाअंतर्गत श्री.अंबरिष महाराज टेकडी ग्रुप,अमळनेर, विकास आराखडा अंतर्गत श्री.अंबरीष महाराज टेकडी शुशोभीकरण करण्यात येत आहे, त्यात टेकडीवर वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन करण्यात येत आहे, तरी या आदर्श पर्यावरणपूरक उपक्रमातुन ३० हजार रोप लावली गेली व जगविली, दररोज येथे श्रमदान केले जाते, ८ वर्षांपासून टेकडीची झालेली कायापालट आपण सर्व बघत आहोत आमच्या श्रमाच्या घामाला सर्वांची साथ असल्यामुळे येथे मानव निर्मित जंगल उभे राहिले आहे पण अश्या टेकडीवरील वृक्षांना अज्ञात समाज कंटकांनी होळीच्या दिवशी दि.१७/०३/२०२२ रोजी आग लावली तो एक महिना होत नाही दुसऱ्यांदा परत दि.२१/०४/२०२२ रोजी आग लावली..
अंबऋषी टेकडीवरील वृक्षांना अज्ञात समाज कंटकांनी वेळोवेळी नुकसान केले आहे. येथे दररोज गुरं चराई साठी सोडली जातात तर, कधी झाड तोडली जातात, तर कधी पार्टी करून दारू बॉटल फोडून ठेवतात खालेले उष्ट रस्त्यावर फेकून जातात, तर कधी रोमिओ झाडावर नाव करून आपले प्रेम जगा समोर ठेवतात. आता तर आग लावण्याचा संतापजनाक प्रकार केल्याची घटना सतत घडली आहे.
सदर आग ससे व पान कोबडी पकडणाऱ्या लोकांनी लावली आहे, सदर ठिकाणी सापळे मिळाले आहे, प्रत्येक्ष दर्शी ने सांगितले की गावातील 8 ते 10 लोक टेकडीवर होते, ससे लपलेले असल्यामुळे आग लावली व त्यांनी 6 ससे, 8-12 पान कोंबडी, तीतूर 3 दुपारी पकडले. त्यामुळे अशा पर्यावरण विरोधी समाज कंटकांवर कारवाई करण्याची मागणी आम्ही टेकडी ग्रुप करतो. या विरोधात आपल्याला निवेदन देण्यासाठी सर्व अमळनेर जनता, पर्यावरण प्रेमी, समाज सेवक, पत्रकार बंधू, व्यापारी संघटना इ. बांधवानी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे, यासाठी आपण आम्हाला सहकार्य करून उपकृत करावे,
श्री.अंबरीष महाराज टेकडीवर फार मोठे प्राचीन मंदिर श्री अंबरीष महाराज आहे. त्यामुळे पावित्र्य टिकविणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.

वर्षातून एकदा आषाढी च्या दुसऱ्याच दिवशी फार मोठी यात्रा भरत असते.
सदरच्या यात्रेत दीडलाख भाविक सहभागी होतात.त्यामुळे सदर परिसरात सुविधा उपलब्ध झाल्यास (स्ट्रीट लाईट, प्रसाधन गृह, रस्ता, खेळणे इ. ) भाविकांची सोय होईल, म्हणून सदरच्या श्री. अंबरीष महाराज टेकडी परिसराची सुरक्षा व पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सरकारी स्तरावर कारवाई करण्यात यावी. ही विनंती.

अध्यक्ष – श्री आशिष शंकर चौधरी
श्री.अंबरिष महाराज टेकडी ग्रुप, अमळनेर. तसेच सर्व टेकडी ग्रुप सदस्यांच्या निवेदनावर सह्या आहेत.
सदर पत्राच्या प्रति म. श्री. गुलाबराव पाटील, पालक मंत्री, जळगांव.
म.श्री.अनिल पाटील,आमदार, विधानपरिषद, अमळनेर. म.जिल्हाधिकारी सो जळगाव,जि.जळगाव म.तहसीलदार सो.अमळनेर जि जळगांव. मा. प्रांताधिकारी सो.,अमळनेर भाग,अमळनेर पोलीस निरीक्षक सो,अमळनेर पोलीस स्टेशन अमळनेर, जि. जळगाव.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button