Amalner

स्वातंत्र्य ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून त्यासाठी मुक्तीदायी व्यवस्थेची गरज आहे..भुरा कार प्रा शरद बाविस्कर

स्वातंत्र्य ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून त्यासाठी मुक्तीदायी व्यवस्थेची गरज आहे..भुरा कार प्रा शरद बाविस्कर

अमळनेर स्वातंत्र्य ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून त्यासाठी मुक्तीदायी व्यवस्थेची गरज आहे. अशी व्यवस्था व त्यासाठी पूरक वातावरण निर्माण करणे ही शिक्षणक्षेत्राची जबाबदारी आहे.असे प्रतिपादन ‘भुरा’ या बहुचर्चित ग्रंथाचे लेखक तथा जे एन यु नवी दिल्ली येथील फ्रेंच तत्वज्ञानाचे प्राध्यापक शरद बाविस्कर यांनी पू.साने गुरुजी वाचनालय व ग्रंथालय येथे जाहिर संवाद कार्यक्रमात
केले.

डॉ शरद म्हणून वावरत असतांना स्वशोध घेत व्यवस्थेचे स्वरूप उलगडणारा प्रवास म्हणजे “भुरा” असे डॉ.बाविस्कर यांनी पुढे सांगितले. साने गुरुजी वाचनालय व ग्रंथालय अमळनेर व मराठी साहित्य परिषद शाखा अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मानवी विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य प्रमोद पवार होते. प्रमुख वक्ते म्हणून जळगांव चे मू.जे महाविद्यालय येथील प्राध्यापक देवेंद्र इंगळे यांनी सांगितले की,जात हे भारतातील प्रमुख वास्तव असून मराठीतील बहुतेक साहित्य या वास्तवापासून दूर घेऊन जाणारे असल्यामुळे दुभंगलेल्या साहित्याने साहित्य विश्वाची हानी केलेली आहे या पार्श्वभूमीवर भुरा हे वास्तवाला भिडणारे महत्वपूर्ण पुस्तक आहे.कार्यक्रमाच्या सुरवातीस पू. सानेगुरुजी , महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमांना मान्यवरांनी पुष्प अर्पण केले.यावेळी प्रा नितीन पाटील, दर्शना पवार, सारांश सोनार, साने गुरुजी ग्रंथालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, सचिव प्रकाश वाघ,मसापचे कार्याध्यक्ष रमेश पवार, प्रा.लिलाधर पाटील, रणजित शिंदे आदि उपस्थित होते.

मराठी आत्मकथनाची एक साहित्यिक परंपरा महाराष्ट्राला लाभलेली असून दलित आत्म कथना नंतर भुरा हे या परंपरेला समृद्ध करणारे आत्मकथन आहे असे प्रा.नितीन पाटील यांनी सांगितले. सध्या बहुचर्चित होत असलेली भुरा ही अनेक अर्थाने महत्वपूर्ण साहित्यकृती असून विविध घटकातील वाचकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे कार्यक्रम संयोजक प्रा लिलाधर पाटील यांनी सांगितले.

केवळ शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळवावी हे बुरा चे उद्दिष्ट नसून यापलीकडे जाऊन व्यवस्थेची चिकित्सा करायला शिकवणारे हे पुस्तक असल्याचे सांगून दर्शना पवार यांनी महिलांसाठी देखील एक समान परिस्थिती निर्माण करावी असे आवाहन केले. जीवनातील प्रत्येक क्षणाकडे गांभीर्याने व नवीन दृष्टीने पाहायला लावणारे व अंतर्मुख करून प्रेरणा देणारे हे आत्मचरित्र असल्याचे युवा वक्ता सारांश सोनार यांनी सांगितले.
खान्देश च्या मातीशी नाळ जोडलेल्या साहित्यिकांचा जाहीर संवाद अमळनेर च्या साहित्य चळवळीत विकासात मोलाची भर टाकेल असे प्रास्ताविक संयोजन समितीचे रणजित शिंदे यांनी केले. आभार प्रदर्शन वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी मानले.
अमळनेर चे सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ व चित्रकार डॉ शरद बाविस्कर यांनी लेखक प्रा. डॉ शरद बाविस्कर यांना रेखाचित्र भेट दिले.प्रमोद संदानशिव यांनीही चित्रकृती भेट दिली. यावेळी सभागृहात परिवर्तन चे जेष्ठ कार्यकर्ते शंभू पाटील, प्रा.अशोक पवार यांचेसह साने गुरुजी वाचनालय ग्रंथालयाचे संचालक मंडळ,प्राध्यापक, प्राचार्य, साहित्यिक, युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.सुनील वाघमारे, गौतम सपकाळे,
प्रा कृष्णा संदांशिव,किरण बागुल, निखिल बैसाणे,अमोल सदांशिव, निलेश किर्तक, दिपक वाल्हे यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button