Amalner

रोटरी क्लब अमळनेरतर्फे मोफत महिलांचे कॅन्सर तपासणी शिबीर

रोटरी क्लब अमळनेरतर्फे मोफत
महिलांचे कॅन्सर तपासणी शिबीर

अमळनेर : येथील सामाजिक विकास संस्था रोटरी क्लब तर्फे महिलांसाठी बुधवार दि.१३ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी९•३० ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत डाॅ. प्रसंन्ना जोशी यांच्या गणेश हाॅस्पीटल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले आहे.
या तपासणीत महिलांचा स्तनांच्या कॅन्सरचे टेस्ट व गर्भाशय कॅन्सर टेस्ट तपासणी अत्याधुनिक मेमोग्राफी व्हॅन द्वारे विनामुल्य करण्यात येणार आहे. अमळनेर येथील ३५ वर्षावरील महिलांसाठी मेमोग्राफी व पॅपस्मिअर च्या तपासण्या करण्यात येणार आहे. यासाठी गणेश हाॅस्पीटल येथे नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यात प्रथम येणार्‍या १०० नोंदणी केलेल्या महिलांची तपासणी करण्यात येणार आहे. साधारण या टेस्ट साठी दवाखान्यात २५०० रू. लागतात ते या ठिकाणी अगदी विनामूल्य करून देण्यात येणार आहे. या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी प्रेसिडेंट वृषभ पारख व मानद सचिव प्रतिक जैन सह सर्व रोटरी क्लब सदस्यांनी केले आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button