India

आरोग्याचा मुलमंत्र..कडीपत्ता सेवनाचे फायदे

आरोग्याचा मुलमंत्र..कडीपत्ता सेवनाचे फायदे

असंख्य गुणांमूळे कढीपत्ता हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचं सिध्द झालं आहे. फोडणीत जिरं आणि मोहरीसोबत कढीपत्ता टाकला की, असा मस्त खमंग वास सुटतो की, लगेचच भूक चाळवते. डाळ, आमटी, कढी यामध्ये कढीपत्ता आवर्जून घातला जातो. पण जेवणाला चव आणण्याव्यतिरिक्तही कढीपत्ता चे फायदे आहेत जे तुम्हाला माहीत हवेत. जर तुम्ही डाळीत, आमटीत, भाजीत आलेला कढीपत्ता बाजूला काढून टाकत असाल तर तुम्ही तुम्ही आताच कढीपत्त्याचे सेवन सुरु करा तुम्हाला तुमच्यात झालेला बदल लगेच जाणवेल. मग कढीपत्ता खाण्याचे फायदे जाणून घेण्यासाठी तयार आहात?

१) केसांसाठी फायदेशीर
कढीपत्त्यामध्ये लोह, ‘क’आणि ‘अ’ जीवनसत्त्व, तसंच आयोडिनचं भरपूर प्रमाण आहे. त्यामुळे रुक्ष आणि गळणाऱ्या केसांसाठी हे संजीवनी ठरू शकते.

गरजेपेक्षा जास्त केमिकल्सचा वापर आणि प्रदूषणामुळे केसांचं नुकसान होतं. कढीपत्त्यात केसांना निरोगी ठेवणारी तत्त्वे आहेत. या पानांचा बारीक लेप बनवावा. मग तो लेप केसांच्या मुळाशी लावावा.

कढीपत्त्याची पानं खाल्ल्यानं केस काळे, लांब आणि घनदाट होतात. कोंड्याची समस्याही दूर होते.

२) कढीपत्त्यात अँटी-ऑक्सिडेंट, अँटी बॅक्टेरीयल, अँटी-फंगल गुण आहेत. त्यामुळे फंगल इन्फेक्शन आणि पिंपल्स येण्यापासून बचाव होतो.

३) कढीपत्त्यामुळे पदार्थांना चव येते. कढीपत्त्यामुळे जिभेवरच्या चवीची संवेदना वाढते.

४) कढीपत्ता आयरन आणि फॉलिक अँसिडचा स्रोत आहे. आयरनची कमतरता फक्त शरीरात आयरन नसल्यानं नाही तर शरीरामध्ये आयरन मुरत नसल्यामुळे होते. याव्यतिरीक्त फॉलिक अँसिड आयरन शोषून घेण्यास मदत करते.

५) कढीपत्त्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर असते. ब्लडमधील इन्सुलिनला प्रभावित करुन ब्लड-शुगर लेवल कमी करते.

६) कढीपत्त्यामुळे पचनशक्ती वाढते आणि वेट लॉससाठी मदत होते. यासाठी जास्त वजन असलेल्या लोकांनी कढीपत्त्याचं सेवन नियमित करावं. रोज उपाशीपोटी कढीपत्ता खाल्लात तरी चालेल.

७) कढीपत्त्याच्या सेवनानं कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. रक्तातील चांगल्या कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणाला वाढवून हृदयासंबंधी रोग आणि एनथेरोक्लेरोसीसचे रक्षण करते.

८) तुम्हाला कफाचा त्रास असेल तर कढीपत्त्याच्या पावडरमध्ये एक चमचा मध मिसळून त्याचं चाटण तयार करा. रोज हे चाटण खाल्लं तर कफाच्या त्रासातून मुक्ती होईल.

डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
{ होमिओपॅथी तज्ञ }

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button