Pandharpur

पंढरी लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य तपासणी बुधवार गुरुवार शुक्रवार सकाळी ९ ते सायंकाळी ८ पर्यंत होणार तपासणी

पंढरी लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य तपासणी बुधवार गुरुवार शुक्रवार सकाळी ९ ते सायंकाळी ८ पर्यंत होणार तपासणी

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर शहरासह तालुक्यातील नागरिकांना लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पुणे तीन दिवस मोफत आरोग्य तपासणी ठेवली असून याचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर संजय देशमुख यांनी केले आहे.
बुधवार दिनांक 28 ऑक्टोंबर गुरुवार 29 ऑक्टोंबर व शुक्रवार 30 ऑक्टोंबर रोजी हृदयाचे आजार किडनी व मूत्रविकार त्वचारोग मेंदू व मणका स्त्रीरोग मेडिसिन विभाग या सहा विभागातील प्रमुख डॉक्टरांच्या मार्फत सकाळी 9 ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत आरोग्य तपासणी करण्यात येणार असून या दिवशी सोनोग्राफी एक्स-रे सिटीस्कॅन एम आर आय इको रक्त तपासणी ऍन्जिओग्राफी इत्यादी तपासण्या करण्याची गरज असल्यास त्या दिवशी तपासणी केलेल्या रुग्णांना 50 टक्के सवलत मिळणार आहे या मोफत आरोग्य तपासणी दरम्यान ईसीजी एक्स-रे रक्तातील साखर या तपासण्या मोफत केल्या जातील त्याचबरोबर ऑपरेशनची गरज पडल्यास महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील येथील नवीन करार नाक्या नजीक असलेल्या लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत तपासणीसाठी रवी जाधव ९५०३२६६०३२, सुभाष सरगर ७८८८०१००४१, अजय अहिरे९७६३६४९९७२,९९७५३३२७८१, ९५६१७०४०११, या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन डॉक्टर संजय देशमुख यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button