Pandharpur

भीमशक्ती सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ च्या वतीने विश्वमाता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कोव्हिड लसीकरण व नेत्र तपासणी मोफत शिबिर संपन्न

भीमशक्ती सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ च्या वतीने विश्वमाता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कोव्हिड लसीकरण व नेत्र तपासणी मोफत शिबिर संपन्न

प्रतिनिधी
रफिक अत्तार

पंढरपूर शहरातील संतपेठ विभागांमध्ये भिमशक्ती सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रिडा मंडळ व रमामाता महिला मंडळ महापुर चाळ यांच्या वतीने आज विश्वमाता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 15 ते 18 वयोगटातील मुली व मुलांकरीता कोवॅक्सिन लस
व18 वया पुढील सर्व नागरिकांना पहिला व दुसरा डोस देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या उपक्रमास संतपेठ महापूर चाळ,बडवेचर झोपडपट्टीतील नागरिकांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या लसीकरण मोहिमेत परिसरातील 150 नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला.यावेळी प्रतिमेचे पूजन पंढरपुर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष मा.सौ.साधना ताई भोसले उपनगराध्यक्ष मा.सौ.श्वेता ताई डोंबे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितीत म्हणून नगरसेवक मा.संजय निंबाळकर नगरसेवक मा.डी.राज सर्वगोड नगरसेवक मा.कृष्णा वाघमारे वंचित आघाडीचे मा.पै.विकास गायकवाड मा.विलास माने ,मा.पै.माऊली काळे व मंडळाचे आधारस्तंभ मा.उमेश सर्वगोड मा.सुधीर सर्वगोड, मा.मिलींद सर्वगोड, मा.अक्षय कदम तसेच मंडळाचे सर्व जेष्ठ मार्गदर्शक सर्व प्रमुख पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थितीत होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button