Peth

तालुका पेठ मधील माळेगाव स्वस्थ धान्य दुकान येथे मोफत स्वस्त धान्यवाटप

तालुका पेठ मधील माळेगाव स्वस्थ धान्य दुकान येथे मोफत स्वस्त धान्यवाटप

ता.पेठ प्रतिनिधी विजय देशमुख

आज पेठ तालुक्यातील माळेगाव स्वस्थ धान्यदुकान क्रमांक-२ येथे मा.पंतप्रधानाच्या आदेशाने स्वस्त धान्य वाटप करण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता देशात सध्या सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे उद्योग धंदे व रोजगाराची साधने सर्वच ठप्प आहे. अशात गोरगरिबांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून शासनाने अंत्योदय,बीपीएल शिधापत्रिकाधारकांना प्रती व्यक्ती ५ किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. याच अंतर्गत स्वस्त धान्य दुकानात धान्य पोहचवून त्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे.
माळेगाव येथे आज स्वस्त धान्य वाटापाचे उद्घाटन करण्यात आले.
मा.श्री.विजय देशमुख भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
ग्रामपंचायत माळेगाव सरपंच मा.भरत चौधरी,सदस्य पुंडलिक देशमुख.दुकानदार हेमंत हलकंदर आदि उपस्थीत होते.

Leave a Reply

Back to top button