Amalner

बळीराजा पीक कर्ज काढण्यासाठी करतोय हेलपाटे शहरात गेल्यावर होतात हाल बळीराजा ने मांडल्या व्यथा

बळीराजा पीक कर्ज काढण्यासाठी करतोय हेलपाटे शहरात गेल्यावर होतात हाल बळीराजा ने मांडल्या व्यथा

रजनीकांत पाटील

अमळनेर तालुक्यातील सण 2020-21 ह्या वर्षांतील पीक कर्ज रक्कम बँकेने राष्ट्रीयकृत शाखेत वर्ग न करता शेतकऱ्यांच्या स्थानिक शाखेत वर्ग करण्याची मागणी केली असता शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांना लेखी निवेदन दिले असून देखील तरी आजच्या घडीला बळीराजा गावातून शहरात पैसे काढण्यासाठी हेलपाटे करत पोहचतोय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना
पीक कर्जाची रक्कम काढण्यासाठी शहरात जावे लागत असल्याने या बाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे या बाबत शहरात कसे पाहचावे सध्या च्या स्थितीत शहरात जाण्यासाठी कोणतीही वाहने नसल्याने नागरिक कोणाच्या आधाराने जाईल काही वयोवृद्ध शेतकरी यांना ब्लडप्रेशर तर काहींना शुगर चा त्रास असल्याने अशा परिस्थितीत शहरात जाणे म्हणजे या अखेरची ची घटका मोजन ही बाब आहे जून महिना जवळ येऊन ठेपला असता शेतकऱ्यांना बी बियाणे रासायनिक खतां साठी पैसा हवा असतो खिशात पैसा शेतकऱ्याचे शेत देखील तयार नाही चिंता व्यक्त केली आहे.

खेड्यातील काही वयोवृद्ध नागरी हेलपाटे करत शहरात गेली असता त्याना शहरातील बरेच एटीएम बंद आढळेल असता शहरात पायदळ फिरावे लागले एकीकडे वरून बसणार उन्हाचा तडाखा जीवाची होणारी लाहीलाही व दुसरी कडे कोरोंना ची धास्ती व पोलिसांचा मार बसण्याचा धाक ATM मशीन शोधले असता तर काही ठिकाणी लांबच लांब रांगा उभ्या दिसल्याने वयोवृद्ध नागरिकांचा जागीच जीव खाचल्याची बाब या बाबत शिरूड येथील शेतकऱ्यांनी ठोस प्रहार जवळ व्यथा मांडली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button