Pune

अखेर चार वर्षाचा स्वर्णवचा सापडला

अखेर चार वर्षाचा स्वर्णवचा सापडला..!

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे: बालेवाडी येथुन मुलाचे अपहरण झाले होते तो दहा दिवसानंतर पुनावळे येथे तो सापडला आहे . अपहरणकर्ते पळून गेले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याच्या शोधासाठी सोशल मीडियावर अनेकांनी आवाहन केलं होतं मात्र अखेर हा मुलगा सुखरुप घरी परतला आहे.

काय आहे प्रकरण ?
पुण्यासारख्या शहरात हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता . सीसीटीव्ही फुटेजमध्ये केवळ एक व्यक्ती या मुलाला काळ्या रंगाच्या ॲक्टिवा दुचाकीवर घेऊन जात असल्याचे दिसत होते . त्याच्याच आधारावर तपास सुरू करत पोलिसांनी अखेर या मुलाला शोधून काढले आहे. पुणे पोलिसांपुढे सदर प्रकरणाचा तपास लावण्याचे मोठे आव्हान होते.

पुणे शहरातील वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये या मुलाचे फोटो व्हायरल केले जात होते तसेच पालक यांचे नंबर देखील देण्यात आले होते. १७ तारखेला देखील मुलाच्या वडिलांनी भावनिक आवाहन करत ‘ तुम्हाला हवं ते देतो फक्त माझा बाळ मला द्या ‘ असे म्हटले होते . आमच्या कठीण काळात आमच्यासाठी प्रार्थना करण्याचे देखील आवाहन त्यांनी केले होते. स्वर्णवचा शोध लावणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान बनून राहिलेले होते. .

सीसीटीव्ही फुटेजमध्ये केवळ एक व्यक्ती या मुलाला काळ्या रंगाच्या ॲक्टिवा दुचाकीवर घेऊन जात असल्याचे दिसत होते . त्याच्याच आधारावर तपास सुरू होता त्याला यश आले असून अखेर स्वर्णव सापडला असल्याने पालकांचा जीव भांड्यात पडलेला आहे .अपहरण झालं त्यावेळी त्यानं निळ्या रंगाचा टीशर्ट आणि जीन्स पॅन्ट घातलेली होती. नागरिकांना अपहरणकर्ता किंवा स्वर्णव चव्हाण यासंदर्भात काही माहिती मिळाल्यास ती पोलीस किंवा चव्हाण कुटुंबीयांकडे द्यावी, असं आवाहन सर्व थरावर करण्यात येत होते.

दरम्यान, स्वर्णव दहा दिवस होता कुठे? तो राहिला कुठे? कोण त्याला घेऊन गेलं होतं? त्याच्यासोबत नेमकं काय घडलं? याची माहिती मिळू शकलेली नाही. असं असलं तरी स्वर्णव घरी परतल्यामुळे त्यांच्या आईवडिलांच्या जीवात जीव आलाय.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button