Nandurbar

जबरी चोरीच्या गुन्ह्यातील चार आरोपींना सात वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व एकुण १९ लाख रुपये दंड

जबरी चोरीच्या गुन्ह्यातील चार आरोपींना सात वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व एकुण १९ लाख रुपये दंड

नंदुरबार फहिम शेख

दि.१९/०८/२०२० रोजी नंदुरबार शहरातील गणपती मंदीराजवळील देवेंद्र चंदनमल जैन यांच्या डी. सी. डेव्हलपर्सच्या कार्यालयात सकाळी ०८.३० वाजेच्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी प्रवेश करून दुकानातील नोकराला पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण करून, नोकरास हातपाय बांधून ड्रावरमध्ये ठेवलेली रोख रक्कम १५,६९,०००/- रुपये तर विक्रमसिंग राजपूत यांच्या घरून ४ लाख रुपये अशी एकुण- १९,६९,०००/- रुपये जबरीने चोरून नेली होती. देवेंद्र चंदनमल जैन यांनी दिलेल्या फिर्यादवरून नंदुरबार शहर पोलीस स्टेशन येथे गुरनं. ६५८/२०२० भादंवि क कलम ३९४,१२० (ब), ३४२,३८०, ३२३,३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३ / २५, सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम चे कलम ३७(१)(३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासादरम्यान तांत्रिक पुराव्यांच्या सदरचा गुन्हा हा फिर्यादीचे दुकानावर काम करणारा उमेदसिंग भवानीसिंग राजपूत याने आपल्या सहकाऱ्यांसह केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावरून १) उमेदसिंग भवानीसिंग राजपूत, रा. मोहकल, ता. सिवनी, जि. बाडमेर २) भगवतसिंग ऊर्फ भगू जोगसिंग राजपूत, रा. साकलाकी दाहनी, ता. समदडी, जि.बाडमेर ३) उत्तम जेसाराम सुंदेशा ऊर्फ माळी, रा. भिनमाल, ता. भिनमाल, जि. जालोर ४) राजू माळी ऊर्फ हरसनाराम सुजानराम चौधरी, रा. निबवास, ता. भिनमाल, जि.जालोर यांना अटक करण्यात आली होती व अटकेपासून गुन्ह्यातील आरोपी हे मध्यवर्ती जिल्हा कारागृह, नंदुरबार येथे आहेत. सदर गुन्हयाचे तपासात गुन्हा करतेवेळी वापरलेले हत्यार लोखंडी टॉमी, आरोपींचे कपडे, सेलो टेप, तांत्रिक पुरावे आरोपीतांकडून एकुण ४,३०,०००/- रुपये जप्त करण्यात आले होते. गुन्हयाचा तपास पुर्ण करून सबळ पुराव्यांसह दोषारोप पत्र मा. न्यायालयात सादर करण्यात आले होते.

सदर गुन्ह्याचे कामकाज मा. मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. व्ही. जी. चव्हाण यांच्या न्यायालयात चालून आज दि. १४/०९/२०२१ रोजी न्यायालयाने गुन्ह्यातील चारही आरोपींना ०७ वर्षाची सश्रम कारावासाची व त्यासोबत ४,८४,७५०/ रुपयाचा प्रत्येकी दंडाची शिक्षा सुनावली आहे, दंड न भरल्यास २१ महिन्याचा सश्रम कारावास आरोपींना भोगावा लागणार आहे. अशा प्रकारे एकुण १९,३९,०००/- रुपयाचा दंड ठोठावला आहे. सदर दंड रक्कमपैकी १५,३९,०००/- रुपये फिर्यादी देवेंद्र जैन यांना आणि ४,००,०००/- रुपये साक्षीदार विक्रमसिंग राजपूत यांना नुकसान भरपाई स्वरुपात द्यावे असे आदेश न्यायालयाने दिले आहे. तसेच सदर गुन्हयाचे तपासात जप्त करण्यात आलेली एकुण-४,३०,०००/- रुपये ही रक्कम फिर्यादी यांना अपील कालावधीनंतर देण्यात यावी असे आदेशात नमुद केले आहे.

गुन्ह्याचा तपास नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री. सुनिल नंदवाळकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किशोर नवले व पोलीस उप निरीक्षक श्री. योगेश राऊत यांनी केला होता. सरकारी अभियोक्ता म्हणून अॅड. सुनिल पी. पाडवी यांनी कामकाज पाहिले आहे तर कोर्ट पैरवी अंमलदार म्हणून पोना ९४७ गिरीश पाटील, पोना / ६४२ मनोज साळुंके यांनी कामकाज पाहिले.

मा. पोलीस अधीक्षक, नंदुरबार यांनी सर्व तपासी अधिकारी, कोर्ट पैरवी अंमलदार आणि सरकारी अभियोक्ता अॅड. सुनिल पाडवी यांचे अभिनंदन केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button