Rawer

माजी मंत्री तथा राष्ट्रवादी नेते श्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवस सप्ताहानिमित्त निंभोरा परिसरात ११कलमी कार्यक्रमाचे नियोजन. “झाड माझ्या नाथाभाऊंचे”वृक्षारोपणाचे निंभोरा पॅटर्न अभियान राबविणार-ऍड रवींद्रभैय्या पाटील.

माजी मंत्री तथा राष्ट्रवादी नेते श्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवस सप्ताहानिमित्त निंभोरा परिसरात ११कलमी कार्यक्रमाचे नियोजन.
“झाड माझ्या नाथाभाऊंचे”वृक्षारोपणाचे निंभोरा पॅटर्न अभियान राबविणार-ऍड रवींद्रभैय्या पाटील.

संदिप कोळी निभोरा – रावेर

रावेर : येथील कृषी विद्यालयाच्या सभागृहात राष्ट्रवादीचे नेते तथा माजीमंत्री एकनाथराव खडसे यांच्या दि.०२सप्टेंबर रोजी येणाऱ्या ६९व्या वाढदिवसानिमित्त निंभोरा परिसरातील राष्ट्रवादीप्रेमींनी ०२सप्टेंबर ते ०९सप्टेंबर दरम्यान वाढदिवस सप्ताहाचे नियोजन जाहीर करीत जिल्ह्यात माजीमंत्री खडसे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत झाड माझ्या नाथाभाऊंचे या ब्रीद वाक्यासोबत वृक्षारोपण कार्यक्रम,पक्ष संघटन,शाखा उदघाटन,राष्ट्रवादीचे सदस्य नोंदणी अभियान,जनहितार्थ योजननांसाठी शिबिरं, तरुणांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर,ज्येष्ठ नागरिकांसाठी अनुदान योजना,महिलांच्या बचत गटांसाठी व्यावसायिक मार्गदर्शन शिबीर आदी योजनांचा समावेश आहे.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्रभैय्या पाटील उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. अरुण पाटील,राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष सोपान पाटील,माजी जिप सदस्य रमेश पाटील,जळगाव चे माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी,सावदा नगरीचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे,राष्ट्रवादी सेवा दलाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश पाटील,राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील,जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे,रावेर तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी,पं स सदस्य दिपक पाटील,राष्ट्रवादी रावेर शहराध्यक्ष शेख मेहमूद,जिल्हा उपाध्यक्ष गुणवंत निळ,निंभोरा माजी सरपंच डिगंबर चौधरी,निंभोरा सरपंच सचिन महाले,महिला तालुकाध्यक्ष माया बारी,नंदिनी पंत,आशा सोनवणे,सुरेखा सोनवणे,माजी पं स सदस्य प्रमोद रझोतकर,मुक्ताईनगरचे सोशल मीडिया प्रमुख शिवराज पाटील,बोदवडचे दीपक पाटील, राष्ट्रवादी युवक चे तालुकाध्यक्ष सचिन पाटील,रावेर कार्याध्यक्ष मयूर पाटील,रावेर शहराध्यक्ष प्रणित महाजन,राष्ट्रवादी शिक्षक सेलचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील यांसह राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश फेगडे,विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साईराज वानखेडे,सावद्याचे नगरसेवक कुशल जावळे, सिद्धार्थ बडगे,राजू कोल्हे, राष्ट्रवादी लोकसभा समन्वयक वाय डी पाटील,राष्ट्रवादी युवकांचे जिल्हाउपाध्यक्ष कुणाल महाले,निंभोरा ग्रा पं सदस्य चंद्रकांत खाचणे,मनोहर तायडे,संदीप महाले,युनूस खान,विकास सोसायटीचे चेअरमन मोहन बोंडे,दत्तात्रय पवार,एम टी बोंडे,प्रमोद भोगे,नंदपाल दूध डेअरीचे चेअरमन सुधीर मोरे,तांदलवाडीचे ग्रा पं सदस्य शशांक पाटील,भास्कर चौधरी,भूषण चौधरी,अविनाश पाटील, देवानंद पाटील,सुशील तायडे,शैलेश पाटील,पंकज पाटील, गोपाळ पाटील,मोहन महाजन,चावदस पाटील,अंबादास पाटील,किरण नेमाडे,पत्रकार राजीव बोरसे,आशिष बोरसे,दिलीप सोनवणे,सागर तायडे,राष्ट्रवादी ओबीसी सेलचे शहराध्यक्ष जितेंद्र महाजन,उपाध्यक्ष,प्रदीप महाजन, स्वानंद कृषी अध्यक्ष गिरीश नेहेते,गुणवंत भंगाळे,रवींद्र भोगे,मोहन भंगाळे,विवेक बोंडे,ललित पाटील,राहुल पाटील,किरण कोंडे, ज्ञानेश्वर उमक,नवाज पिंजारी,अर्षद पिंजारी,हर्षल ठाकरे,मयूर राणे,भूषण येवले,सुधाकर पाटील,ईश्वर निळे,निलेश पाटील,यांसह तालुकाभरातून राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते.
————- ————-
यावेळी प्रास्ताविकात राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे यांनी निंभोरा परिसरात वाढदिवसप्ताहानिमित्त होणाऱ्या ११कलमी कार्यक्रमाची माहिती दिली. तर कार्यक्रमात राजेश वानखेडे,सोपान पाटील,रमेश पाटील दीपक पाटील,अशोक लाडवंजारी यांसह वाय डी पाटील,मनोहर तायडे,प्रणित महाजन, निंभोरा सरपंच सचिन महाले आदींनी पक्ष बांधणी,नाथाभाऊंचे कार्य,मंत्रिपदासाठी मुंबई भेट, रावेरातील आरोग्य शिबीर,सावद्यातील कार्यक्रमाचे नियोजन,आदींबाबत आपली मनोगते व्यक्त केली.माजी आ अरुण पाटील यांनी ११ कलमी कार्यक्रमाच्या नियोजनाचे कौतुक करीत या सप्ताहानिमित्त अजून एक बैठक धामोडी येथे घेणार असल्याचे सांगत पक्ष संघटन बांधणीवर भर दिला.अशोक लाडवंजारी यांनी आपल्या मनोगतात “झाड माझ्या नाथाभाऊंच”या कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम अनुकरणीय असल्याचे सांगितले.अध्यक्षीय भाषणात जिल्हाध्यक्ष ऍड रविंद्र भैय्या पाटील यांनी माजीमंत्री खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या ११ कलमी कार्यक्रमाचे कौतुक करीत जिल्ह्यातील पाहिले नियोजन सादर केल्याबाबत निंभोरा येथील कार्यकर्त्यांचे कौतुक केले.तसेच झाड माझ्या नाथाभाऊंच या उपक्रमाची नोंद घेत हा निंभोरा पॅटर्न जिल्हाभरात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे राबविणार असल्याचे सांगितले.तसेच माजीमंत्री नाथाभाऊ लवकरच जिल्ह्यात फक्त आमदार नव्हे तर नामदार म्हणून परतणार असल्याचे सांगितले.
——— —————
निंभोरा सरपंच सचिन महाले यांनी केली टँकर उपलब्धतेच्या घोषणा-
या कार्यक्रमात निंभोरा सरपंच सचिन महाले यांनी आपल्या मनोगतात नाथाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त निंबजोरा गावासाठी स्वखर्चाने मैफट टँकर देण्याचे या कार्यक्रमात जाहीर केले.यासाठी जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्र भैय्या पाटील यांनी सरपंच महाले यांचा सन्मान केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका समन्वयक राज खाटीक यांनी तर आभार राष्ट्रवादी ओबीसी सेलचे सरचिटणीस तथा ग्रा पं सदस्य शेख दिलशाद सर यांनी केले.

संबंधित लेख

Back to top button