Pachora

माजी सैनिक भानुदास पाटील ठरताय अपंग बांधवांनसाठी प्रेरणा स्थान

माजी सैनिक भानुदास पाटील ठरताय अपंग बांधवांनसाठी प्रेरणा स्थान

प्रतिनिधी प्रविण पाटील-

भारतीय सैन्यात प्रवेश करून भारत मातेच रक्षण करन्याची प्रतेक तरूण वर्गाला अपेक्षा असते व देशासाठी बलिदान देण्याचं सामर्थ्य खूप काही कमी लोकांमध्ये दिसून येते, याचच एक उदाहरण म्हणजे पाचोरा तालुक्यातील बाळद येथील माजी सैनिक भानुदास जगन्नाथ पाटील वयाच्या 19 व्या वर्षी सन 1984 मध्ये ते भारतीय सैन्यात दाखल झाले देशसेवा हाच आपला प्रण आणि श्वास ही देशाची सेवा करताना 1993 साली आर्मी चा लोड मालवाहतूक कानपूर रेल्वे गाडीने घेऊन जात असताना अनावधित पने त्यांचा तोल गेला व त्यांचा उजवा हात त्यात कापला गेला व पायाला ही जबर जखम झाली, व त्यांना शरिरिक अपंगत्व आले पण हार न मानता त्यांनी आपली देशसेवा पुर्ण केली व आज ते अपंग बांधवानसाठी एक प्रेरणा स्थान ठरत आहेत अपंग बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत असतात अपंग बांधवांना नेहमीच ते मार्गदर्शन करत असतात अपंग बांधवानी खचून न जाता येणाऱ्या संकटावर शत्रू सारख तुटून पडाव व आपल्या जीवनाला एक सकारात्मक दिशा देऊन जगाव हा संदेश ते नेहमीं अपंग बांधवांना देत असतात अशा सच्या देशभक्त जवानांना दिव्यांग शक्ती चा सलाम.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button