Paranda

शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाच्या पोस्टर वरून माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा फोटो गायब .

शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाच्या पोस्टर वरून माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा फोटो गायब .

परंडा

पंचायत समीती , जिल्हा परिषदेच्या निवडणूका जवळ आल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने आमदार तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शना खाली दि १७ जुलै रोजी शिवसेनेच्या वतीने शिवसंपर्क आभियानाचा शुभारंभ आसू येथून सुरु करण्यात आला आहे .

या शिवसंपर्क आभियानच्या पोस्टरवर माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा फोटो नसल्याने पाटील यांना पुन्हा डावलन्याचा कट रचला जात असल्याने ज्ञानेश्वर पाटील यांना मानणारे हजारो कार्यकर्त्य मध्ये नाराजी पसरली आहे .

माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी परंडा मतदार संघात शिवसेना वाढविन्या साठी ३० वर्षा पुर्वी पासुन परिश्रम घेतले होते या मुळे सलग दोन वेळा आमदार म्हणुन निवडून आले पंचायत समिती , नगरपालिके , सोसायटी वर एक हाती सत्ता स्थापन केली होती .

गोरगरीब कार्यकर्त्यांच्या अडचणी साठी धाऊन जानारा नेता म्हणुन ज्ञानेश्वर पाटील यांची ओळख असुन त्याच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग आजही मतदार संघात आहे .

सन २०१७ साली शिवसेना कार्यालयाच्या तानाजीराव सावंत यांच्या हस्ते होणाऱ्या उदघाटन कार्यक्रमात माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांना डावलन्यात आल्याने कार्यकर्त्यांनी खुर्च्याची तोडफोड केली होती .

सावंत व पाटील असे शिवसेनेत दोन गट पडल्याने तालूक्यात शिवसेनेला पंचायत समीती जिल्हा परिषद निवडणूकी मध्ये पराभव स्वीकारावा लागल्याने पंचायत समीती मधील सत्ता गेली होती .

या घटणे ला विसरून २०१९ च्या विधान सभा निवडणुकीत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी तानाजीराव सावंत यांच्या विजया साठी मोठे परिश्रम घेतले होते .

या मुळे पक्षांतर्गत गटबाजी संपली आसल्याचे दिसत होते मात्र संपर्क आभियान च्या पोस्टर वर ज्ञानेश्वर पाटील यांना स्थान न देता डावलल्याने गतबाजीचे गृहण सुटले नाही असेच दिसत आहे .

ज्ञानेश्वर पाटील यांना डावलन्यात आल्यास येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समीती , नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेला मोठा फटका बसन्याची शाक्यता असल्याचे राजकीय जानकार मधुन व्यक्त होत आहे .
या शिव संपर्क आभियान प्रसंगी कृषी व पशू सवंर्धन सभापती दत्ता साळुंखे, शिवसेना जिल्हाप्रमुख,.गौतम लटके रामचंद्र घोगरे , शिवसेना तालुकाप्रमुख आण्णासाहेब जाधव, उप तालुकाप्रमुख शुक्राचार्य ढोरे .पोपट चोबे, पंचायत समिती सदस्य गुलाबराव शिंदे शिवसेना विभागप्रमुख, पदाधिकारी, शिवसैनिक, उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button