Faijpur

फैजपूर शहरात कोविड एकोणीस लसीकरण केन्द्र त्वरित सुरू करावे अशी मागणी माजी नगराध्यक्ष नीलेश राणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे

फैजपूर शहरात कोविड एकोणीस लसीकरण केन्द्र त्वरित सुरू करावे अशी मागणी माजी नगराध्यक्ष नीलेश राणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे
सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल
फैजपूर : फैजपूर शहरातील लोकसंख्या जवळजवळ चाळीस पन्नास हजार एवढी असून सध्याची परिस्थिती नुसार कोविड एकोणीस कोरोना महामारीच्या संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असून शहरातील तसेच परिसरातील नागरिकांना आरोग्यसाठी लसीकरण केंद्र जलदगतीने सुरू करणे आवश्यक झाले आहे फैजपूर शहरातील सुद्धा लसीकरण केंद्र फैजपूर शहरात नसल्याने सदरील शहरातील नागरिकांना न्हावी येथे ग्रामीण रुग्णालयात तसेच पाडळसे हिंगोणे या ठिकाणी जावे लागत आहे सदर ठिकाणी लवकर नंबर लागत नसल्याने नागरिकांना बर्याच वेळेस पुन्हा पुन्हा जाऊन पायपीट करावी लागत आहे तरी फैजपूर शहरात जर लसीकरण केंद्र उभारले तर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना सुद्धा याचा लाभ घेता येईल त्यामुळे लवकरात लवकर लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकते सदर बाबतीत आपल्याशी वेळोवेळी मोबाईलवरून बोलणे झालेले आहे परंतु तसेच तोंडी आश्वासन दिले होते तरीसुद्धा अद्यापपर्यंत एक महाराष्ट्र दिनानिमित्त फैजपूर येथे लसीकरण केंद्र सुरू करू असे आश्वासन दिले होते परंतु अद्यापपर्यंत सुरू झाले नाही तरी महोदय यांनी त्वरित दखल घ्यावी अन्यथा शहरातील भाजपा तर्फे उपोषण करण्यात येईल असा इशारा माजी नगराध्यक्ष नीलेश राणे यांनी दिला आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button