Amalner

Amalner: श्री सद्गुरू सखाराम महाराज विठ्ठल-रुख्मिनी संस्थान तर्फे लायन्स व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

Amalner: श्री सद्गुरू सखाराम महाराज विठ्ठल-रुख्मिनी संस्थान तर्फे लायन्स व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

अमळनेर श्री सद्गुरू सखाराम महाराज विठ्ठल रुख्मिनी संस्थान तर्फे लायन्स व रोटरी क्लब यांच्या सहकार्याने संत सखाराम महाराज पुण्यतिथीनिमित्त मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराचा ३०० रुग्णांनी लाभ घेतला.

अमळनेर येथील संत सखाराम महाराज यात्रोत्सवात विविध उपक्रम राबवले जात आहेत. गरिबांना शिधा वाटप, महिलांची ओटी भरणे, मोफत आरोग्य शिबीर घेतले जातात. शहरातील विविध डॉक्टरांनी रक्तदाब, हृदय विकार, मधुमेह, दंत रोग, नेत्र रोग आदीसह इतर आजार असलेल्या रुग्णांची तपासणी केली. त्यांच्यावर उपचार करून गोळ्या औषधी वाटप करण्यात आले. जीवनश्री ब्लड बँकतर्फे रक्तदान शिबिरात 11 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यावेळी डॉ. अविनाश जोशी, डॉ. किरण बडगुजर, डॉ. नरेंद्र सोनवणे, डॉ. भूषण पाटील, डॉ. अनिल शिंदे, डॉ. संजय चव्हाण, डॉ. निखिल बहुगुणे, डॉ. विक्रांत पाटील, डॉ. अक्षय कुलकर्णी, डॉ. शरद बाविस्कर, डॉ. राहुल मुठे, डॉ. सुमित सूर्यवंशी, डॉ. अनिल वाणी, , डॉ. राजेंद्र पिंगळे, डॉ. विशाल जोशी, डॉ. अभिषेक भट, डॉ. नरेंद्र महाजन, डॉ. बिराज मुठे, डॉ कौस्तुभ वानखेडे, डॉ. रमण पाटील डॉ. अपर्णा मुठे, डॉ. नितीन उपासनी, डॉ. मिलिंद नवसारीकर, डॉ. केदार कुलकर्णी, डॉ. विजय महाजन, डॉ. प्रसन्ना जोशी, डॉ. संजय चव्हाण, डॉ. संदेश गुजराथी, डॉ. निलेश जैन, डॉ. युसूफ पटेल, डॉ. रवींद्र कुलकर्णी, डॉ. अनिल वाणी यांच्यासह शहरातील विविध डॉक्टरांचे सहकार्य लाभले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button