Yawal

धनाजी नाना महाविद्यालयाच्या माजी खेळाडूची भारताच्या प्रशिक्षण शिबिरात निवड

धनाजी नाना महाविद्यालयाच्या माजी खेळाडूची भारताच्या प्रशिक्षण शिबिरात निवड

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

यावल : धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर चा माजी खेळाडू प्रशांत कोळी हा सध्या भारतीय नौदलात कार्यरत आहे व भारतीय नौदलाकडून खेळतांना पटियाला येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केले. पतियाला येथे झालेल्या स्पर्धेतील कामगिरीच्या अधारावर प्रशांत कोळी या खेळाडूची निवड भारतीय संघाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी झाली त्याबद्दल महाविद्यालया कडून सत्कार करण्यात आला. भारतीय संघाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी धनाजी नाना महाविद्यालयातील निवड होणारा प्रशांत हा दुसरा खेळाडू आहे. या पुर्वी तुषार सपकाळे या खेळाडूची निवड झाली होती पण हाताला दुखापत झाल्या मुळे त्याचे अंतरराष्ट्रीय खेळण्याचे स्वप्न अपुर्ण राहिले. पुनश्च एकदा ती संधी प्रशांत च्या रुपाने प्राप्त झाली आहे. प्रशांत कोळी या खेळाडूने महाविद्यालया कडून खेळतांना अखिल भारतीय अंतर विद्यापीठ स्पर्धेत एक सुवर्ण व एक रौप्य पदक प्राप्त केले तसेच खेलो इंडिया खेलो या स्पर्धेत एक रौप्य व एक कांस्य पदक प्राप्त केले. तसेच प्रथम अंतर विद्यापीठ खेलो इंडिया खेलो स्पर्धेत स्वतः च्या नावावर राष्ट्रीय रेकॉर्ड करुन रौप्य पदक प्राप्त केले. प्रशांत कोळी ला अविनाश महाजन व डॉ. गोविंद मारतळे, शारीरिक शिक्षण संचालक यांचे मार्गदर्शन लाभले. या वेळी नुकत्याच पटियाला येथे झालेल्या राष्ट्रीय भारतोलन स्पर्धे करिता महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून कार्य केल्याबद्दल श्री अविनाश महाजन यांचा सुध्दा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभासाठी अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी सर व उप प्राचार्य डॉ. ए आय. भंगाळे, उप प्राचार्य प्रा. ए. जी. सरोदे, जिमखाना समितीचे चेअरमन डॉ. सतीश चौधरी व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीवर्ग उपस्थितीत होते.
अध्यक्षीय भाषणात बोलतांना प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी सर यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले व आपल्या भागातील खेळाडूंनी अशा स्पर्धेत पदक प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगून प्रशांत कोळी ला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गोविंद सदाशिवराव मारतळे यांनी केले व आभार अनिल भंगाळे सर यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button