शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. टी.के.पुरनाळे यांचा स्मृतीदिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न ?
सुनिल नजन/अहमदनगर प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती स्व.त्रिंबकराव काशिनाथ उर्फ डॉ. टी.के. पूरनाळे यांचा प्रथम स्मृती दिन सोहळा शेवगाव येथील निर्मलनगर मधल्या जिल्हा परिषद सदस्या सौ.हर्षदाताई शिवाजीराव काकडे यांच्या प्रुथ्वी बंगल्याच्या परिसरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या प्रसंगी सद्गुरु ह.भ.प. मुकुंदकाका जाटदेवळेकर यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. प्रथम अँड. शिवाजीराव काकडे यांनी शेवगाव तालुक्यातील मांन्यवर मंडळी बरोबरच ह.भ.प. मुकुंदकाका जाटदेवळेकर यांचे भव्य दिव्य स्वागत केले आणि डॉ पुरनाळे यांच्या जिवनावरील लिखित पुस्तकातील सर्व माहिती दिली.ह.भ.प. कल्याण काळे,रामगिरी महाराज, डोंगरे महाराज, बटुळे महाराज, झिरपे महाराज अँड.सुभाष लांडे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.डॉ टी.के. पुरनाळे हे कै.आबासाहेब काकडे शैक्षणिक समुहाचे प्रमुख अँड.शिवाजीराव काकडे यांचे सासरे, आणि अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव गटाच्या सदस्या सौ.हर्षदाताई काकडे यांचे ते वडील होते.या प्रसंगी जगन्नाथ गावडे, तरसेसर,फसले सर निकमसर,राजेंद्र फलके यांच्या सह काकडे शैक्षणिक समुहातील सर्व शिक्षक व्रुंद कोरोणा आजाराचे नियम पाळून मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर .