Bhandardara

साहेबांचे आवडते हॉटेल कोरोना बाधित…. संबंधितावर गुन्हे दाखल करा

साहेबांचे आवडते हॉटेल कोरोना बाधित…. संबंधितावर गुन्हे दाखल करा

भंडारदरा विठ्ठल खाडे

भंडारदरा ता.७: रात्री वाढदिवसाची जोरदार पार्टी झाली सुमारे चाळीस तरुण या पार्टीला उपस्थित होते नी सकाळी हॉटेल चा मालक त्याचा मुलगा व घरातील अजून एका महिला व्यक्तीसह घरातील ११ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली तालुका प्रशासनाने तातडीने १०८ क्रमांक रुग्णवाहिका बोलावून त्यांना अकोले संगमनेर येथे हलविले तर सुमारे ४० व्यक्तींना होम कोरांटाईन करण्यात आल्याची माहिती डॉ संतोष चोळके यांनी दिली त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे .हे क्षेत्र प्रतिबंधात्मक कक्षेत घोषित करण्यात आले असून सील केले आहे त्यामुळे वसाहतीत असलेले हॉटेल कोणाच्या आशीर्वादाने चालू होते? असा सवाल भंडारदरा गावच्या ग्रमस्थाचां प्रशासनास सवाल केला आहे. कारण अकोले तहसीलदार ,राजूर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक व भंडारदरा वसाहतीतील जलविद्युत प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी रोटे याना हॉटेल बंद करण्यासाठी, वारंवार पत्रव्यवहार करण्यात आले,परंतु या निवेदनाकडे कोणीही लक्ष दिले नाही.व शेवटी ते हॉटेल काल पर्यंत सुरू होते.आणि आज तो हॉटेल मालक आणि त्याच्या हॉटेलमधील ११ व्यक्ती कोरोना पोझीटिव्ह अढळले .आणि आज भंडारदरा गावतील नागरिक व भंडारदरा वसाहतीतील नागरिक हादरून गेले आहे.भंडारदरा ग्रामस्थांनी मागणी केली आहे या मध्ये तालुका प्रशासन जे कोणी अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर व हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करावा.अशी मागणी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे केली आहे.पुढील दोन दिवसात कार्यवाही व्हावी अन्यथा भंडारदरा ग्रामस्थ ग्रामपंचायत व कोरोना कमीटी कोणत्याही क्षणी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे सरपंच पांडुरंग खाडे यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री व पर्यटन विकास मंत्री याना भंडारदरा पर्यटन क्षे त्र पर्यटकांसाठी बंद करण्यासाठी निवेदन देण्यात येणार आहे अशी माहित भंडारदरा गावच्या ग्रामपंचायत ग्रामस्थ व सरपंच पांडुरंग खाडे, व उप सरपंच गणपत खाडे यांनी दिली. या होटल मध्ये मुंबई येथून चार दिवसापासून पर्यटक येऊन जेवण करून जातात स्थानिक कमिटीने पोलीस तहसील कार्यालय ,पाटबंधारे विभाग उपअभियंता रोटे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन ही बाब निदर्शनास आणून देऊनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने आज हॉटेल मालकासह ११ लोक बाधित झाले असून यास जबाबदार कोण असा सवाल विचारून भंडारदरा ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे
वाढदिवसाच्या पार्टीत शेंडी व कॉलनीतील २५तरुण व इतर असे सुमारे ४०लोक उपस्थित होते प्रशासनाने याची चौकशी करून त्यांची मेडिकल तपासणी करावी अन्यथा कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक होण्याच्या शक्यता नाकारता येणार नाही. तर नगर येथून एक व्हीआयपी आपल्या नातेवाईकाना घेऊन या हॉटेलमध्ये जेवण करून गेल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Back to top button