Surgana

भारतात लोकशाही वादी युवा महासंघाचे प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रपत्र ड सरसकट घरकूल लाभ दयावा आणि चौकशी रद्द करण्यासाठी निवेदन

भारतात लोकशाही वादी युवा महासंघाचे प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रपत्र ड सरसकट घरकूल लाभ दयावा आणि चौकशी रद्द करण्यासाठी निवेदन

विजय कानडे

मा.सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी पंचायत समिती सुरगाणा यांना भारतात लोकशाही वादी युवा महासंघ(D.Y.F.I) या युवाशक्तींच्या संघटनेने निवेदन सादर केले .निवेदनात म्हटलं आहे की, प्रधानमंत्री आवास योजना प्रपत्र “ड” मधील पात्र होऊन आँनलाईन झालेले तालुक्यातील एकुण ६१ ग्रामपंचायतीचे १७,हजार ९५२ आदिवासी लाभार्थी असुन. त्या पात्र झालेल्या सर्व लाभार्थाची घरोघरी जाऊन सरकारी कमिटी तपासणी करणार आहे.म्हणून D.Y.F.I संघटनेचे या तपासणी चौकशी ला कडाडून विरोध करुन अशी मागणी केली आहे की, तालुक्यातील सर्व म्हणजे १७,हजार ९५२ लाभार्थांची कुठलीही तपासणी न करता सरसकट मंजुरी देऊन त्यांना ₹ २,५०,००० (अडीच लाख किंमतीचे)घर विना अट मंजूर करण्यात यावे.आणि जर का जबरदस्ती करुन सरकारी तपासणी कमीटी गावात घुसखोरी करून प्रत्येक्ष घर पाहणी करेल तर गावकरी आणि तपासणी कमिटी यांच्यात संघर्ष होईल याची दखल घ्यावी. असे निवेदनात म्हटले आहे निवेदनाची प्रत पोलीस निरीक्षक सुरगाणा आणि तहसीलदार सुरगाणा यांना देण्यात आली आहे त्यावर पांडुरंग गायकवाड सुभाष भोये मोनिकाताई पवार राहुल आहेर कान्हा हिरे आदींच्या सह्या आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button