sawada

सावदा ॲंग्लो उर्दू शाळेच्या संबंधितांना “कारी गुलाम मुस्तफा” या नावाचा पडतोय विसर!

सावदा ॲंग्लो उर्दू शाळेच्या संबंधितांना “कारी गुलाम मुस्तफा” या नावाचा पडतोय विसर!

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित शाळेचे नाव सन १९९० पासून ते सन २०२०-२१ पावेतो ॲंग्लो उर्दू हायस्कूल असे होते.पंरतू सन २०२१-२२ मध्ये सदर शाळेचे नाव “कारी गुलाम मुस्तफा”अँग्लो उर्दू हायस्कूल असे नामकरण आल्याने शाळेच्या नविन इमारतीवर ह्या पवित्र नावाचा बोर्ड आजही लागलेला दिसतो.तसेच हजरत का़री गुलाम मुस्तफा यांची पुण्यतिथीचा छोटेखानी कार्यक्रम देखील या शाळेत गेल्या दोन महिन्यां दरम्यान साजरा करण्यात आला होता.हे मात्र खरे आहे.

परंतु दि.८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शाळेच्या बाहेरील भिंतींवरील (फलक) बोर्डावर तसेच आज दि.११ मार्च रोजी १० च्या विद्यार्थ्यांचे निरोप समारंभ कार्यक्रमाच्या (बोर्ड) फलकावर का़री गुलाम मुस्तफा यांचे नावाचा उल्लेख शाळा संबंधितांकडून न होणे मागचे कारण त्यांनाच माहीत मात्र यामुळे शहरातील का़री गुलाम मुस्तफा हजरत यांच्यावर प्रेम करणाऱ्यांमध्ये हा विषय चर्चिला जात असून याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहे.तसेच सदरील प्रकार काही शाळा संबंधितांच्या भूतकाळाची पार्श्वभूमी व वाद विवादाशी जोडून बघीतले जात असल्याची चर्चा देखील ऐकण्यास मिळत आहे.सदर शाळेची नविन इमारत यापुर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडल्यामुळे बचाव आत्मक दृष्टीकोण ठेवून फक्त दिखाऊपणा साठी की काय औपचारिकरित्या सदरील पवित्र नाव शाळेस दिल्याची एक खेळी म्हणजे दिल में कुछ और होटो पर कुछ असे चित्र सदरील संपन्न झालेल्या दोन्ही कार्यक्रमाचे फलक बघीतले असता स्पष्ट दिसून येते.असे सुद्धा बोलले जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button