Aurangabad

आठ वर्षीय चेतनची मृत्यूशी झुंज, पालकांनी केली मदतीची आर्त हाक

आठ वर्षीय चेतनची मृत्यूशी झुंज, पालकांनी केली मदतीची आर्त हाक

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : झोका खेळताना पडल्याने बकवालनगर, नायगाव येथे राहणाऱ्या आठ वर्षीय चेतन शिरसाटला “गुलियन बॅरो सिंड्रोम” या आजाराने घेरले. तो सध्या आजाराशी झुंजत असून औरंगाबाद येथील संजीवनी बाल रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे. परिस्थिती अत्यंत गरीब असल्याने व या हलाखीच्या परिस्थितीत आपला उदरनिर्वाह चालविणाऱ्या शिरसाट कुटुंबापुढे हॉस्पिटलचे बिल चुकते करण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे.

दानशूर व्यक्तीनी तसेच संस्थांनी हॉस्पिटलच्या होणाऱ्या बिलाची रक्कम भरण्यासाठी मदतीचा हात द्यावा, अशी आर्त हाक चेतनाच्या वडिलांनी केली आहे. चेतन हा झोका खेळत असतांना जमिनीवर पडला, त्याच्या अवयवांच्या काहीही हालचाली होत नसल्याने चेतनच्या वडिलांनी त्याला जवळच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र त्याच्या तब्येतीत तीळमात्रही सुधारणा होत नसल्याने आणि चेतनच्या तोंडातून फेस येत असल्याने डॉक्टरानी औरंगाबाद येथील संजीवनी हॉस्पिटल मध्ये नेण्याचा सल्ला दिला.

संजीवनी हॉस्पिटल मध्ये चेतनच्या चाचण्या केल्या नंतर त्याला “गुलियन बॅरो सिंड्रोम”नावाच्या आजाराने ग्रासल्याचे दिसून आले. चेतनवर येथे आयसीयूमध्ये व्हेंटिलेटर लावून तज्ञ डॉक्टरांच्या निगराणी खाली उपचार सुरू आहेत. उपचाराला लागणारा खर्च हा 4 लाखाच्यावर जात असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन अवघे 30 हजार रुपये उपलब्ध झाल्याने आणि आजाराच्या उपचाराचा खर्च “महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने”मध्ये बसत नसल्याने आपल्या मुलावर उपचार करत असलेल्या हॉस्पिटलचे बिल चुकते करण्याचे मोठे संकट त्याच्या पालकांपुढे उभे ठाकले आहे. हॉस्पिटलच्या बिलाची रक्कम भरण्यासाठी दानशूर व्यक्तींनी तसेच संस्थांनी मदत करण्याची आर्त हाक चेतनच्या वडिलांनी केली आहे.

संबंधित लेख

Back to top button