sawada

दोन वर्षापासून सावदा पालिकेच्या हद्दीत समाविष्ट भागातील नियमबाह्य पाणी व घर पट्टी कमी होवून मिळावी!

दोन वर्षापासून सावदा पालिकेच्या हद्दीत समाविष्ट भागातील नियमबाह्य पाणी व घर पट्टी कमी होवून मिळावी!

“पालिका प्रशासनाकडे कर कमी करण्या संदर्भात रहिवाशांची निवेदनाद्वारे मागणी”

—————————————-
दि.२२ डिसेंबर २०२१ रोजीच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेत सदरील मुद्दा चर्चेला गेला होता.मात्र या नागरिकांच्या समस्या कडे दुर्लक्ष झाल्याचे आज यावरून दिसून येते.तरी साधारणता एक महिन्यापासून पालिकेत न फिरकणारे प्रशासकीय अधिकारी कैलास कडलग व मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी यावर विचार मंथन करून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकाकडून बाळगली जात आहे.
—————————————-

सावदा तालुका रावेर वार्ताहर युसूफ शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे गेल्या दोन वर्षांपासून शहराची हद्दवाढ झाल्याने संपूर्ण नविन भाग सावदा पालिका हद्दीत समाविष्ट असून या भागात रस्ते, गटारी, स्ट्रीट लाईट, ची सुविधा नही तसेच सदर परिसरात घाणीचे साम्राज्य असून याची पालिकेकडून साफसफाई केली जात नाही.याची अधिकृत माहिती पालिका प्रशासनाला असताना सुद्धा सन २०२१-२२ च्या पाणी व घर पट्टी जास्तीची तथा हद्दी बाहेरील प्रमाणे आकारणी करून तश्या कर पावत्या येथील रहिवाश्याना देण्यात आले आहे.हे मात्र खरे

याबाबत अधिक माहिती अशी की, सावदा पालिका प्रशासन कडून गेल्या दोन वर्षांत कोणतीही सुविधा ह्या संपूर्ण नविन भागात पुरवित नसताना अनेक वर्षांपासून येथील रहिवासी सदरील बिकट परिस्थितीला तोंड देत असल्याची अधिकृत माहिती पालिकेस असताना देखील आजही त्यांना हद्दी बाहेरील श्रेणीत ठेवून पाणी व घर पट्टी जुलमी कर म्हणून जास्तीची आकारण्यात आल्याने या बाबतीत येथील रहिवासी नागरिकांच्या मनात पालिका प्रशासनाविरुद्ध तीव्र स्वरूपाची चीड निर्माण झालेली आहे.

म्हणून आज दि.२८ जानेवारी २०२२ रोजी नगरसेवक फिरोज खान पठाण व अपक्ष नगरसेवक अल्लाबक्ष उर्फ गुड्डू शेठ यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली सर्व त्रस्त नागरिकांनी आप करण्यात आलेले जास्तीचे पाणी व घरपट्टी असे जुलमी कर कमी होऊन मिळावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे सावदा पालिकेचे प्रशासकीय अधिकारी व मुख्य अधिकारी यांच्या अनुपस्थितीमध्ये पालिकेचे कर निरक्षक अनिल कुमार अहुजा यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले त्यावर अकबर खान अमानुल्ला खान,शेख हुसनोद्दीन शेख रफिउद्दीन, अश्फाक खान इस्माइल खान, कादीर गुलाब खाटीक,शेख कमालुद्दीन हुसनोद्दीन यांच्यासह १२० रहिवाशांच्या सह्या आहे. निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी, आयुक्त नाशिक, सचिव व संचालक नगर विकास मंत्रालय मुंबई, आरोग्य संचालक मंत्रालय मुंबई, लोक आयुक्त मुंबई मानव अधिकार आयोग मुंबई यांच्याकडे देखील पाठवण्यात येणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button