Bollywood

सिद्धार्थ च्या मृत्यू नंतर पहिल्यांदाच शहनाज चा व्हिडीओ व्हायरल..!काय म्हणाले चाहते..!

सिद्धार्थ च्या मृत्यू नंतर पहिल्यांदाच शहनाज चा व्हिडीओ व्हायरल..!काय म्हणाले चाहते..!

मुंबई प्रसिद्ध टीव्ही कलाकार सिद्धार्थ शुक्लाने 2 सप्टेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्याने सिद्धार्थ शुक्ला मरण पावला.सिद्धार्थ च्या मृत्यूचा सर्वात मोठा धक्का त्याची मैत्रीण शहनाज गिल ला बसला होता. बिग बॉस 13 मध्ये सिद्धार्थ आणि शहनज यांची ओळख झाली ह्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले होते. सिदनाज या नावाने ही जोडी खूप प्रसिद्ध झाली.

सिद्धार्थ च्या मृत्यूनंतर तब्बल 3 आठवड्यांनी शेहनाज गिलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात ती खूप दुःखी दिसत आहे. या व्हिडिओमध्ये शेहनाज गिल एक पंजाबी गाणे गात आहे. या व्हिडिओवर चाहत्यांच्या कमेंट चा पाऊस पडत आहे. तिला धीर दिला जात आहे.

हा व्हिडिओ कधीचा आहे? याबद्दल योग्य ती माहिती उपलब्ध झाली नाही पण व्हिडिओ सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतरचा असल्याचा अंदाज चाहते व्यक्त करत आहेत.

सिद्धार्थवर अंत्यविधी सुरु असताना शेहनाज स्वत:ला सांभाळून शकली नव्हती. आणि आतांबशेहनाजचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात तिच्या चेहऱ्यावर सिद्धार्थ लांब गेल्याचं दु:ख साफ दिसून येत आहे. हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button