Lonand

लोणंदसाठी तांबवे धरणातून सोडले पाणी . कापडगाव सह लोणंदच्या दक्षिणेकडील वसाहतींना फायदा होणार .

लोणंदसाठी तांबवे धरणातून सोडले पाणी .
कापडगाव सह लोणंदच्या दक्षिणेकडील वसाहतींना फायदा होणार .

लोणंद प्रतिनिधी दिलीप वाघमारे
दि.६

लोणंद शहराला सध्या भेडसावणारा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तांबवे ता फलटण येथील धरणातून आज दि सहा मार्च पासून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

उन्हाळ्याच्या तोंडावर निरा नदीपात्रातील पाणी पातळी कमी होऊन दरवर्षीच लोणंद शहराला याचा फटका बसतो. लोणंद शेजारी असलेल्या जांभळीच्या मळा, सईबाई सोसायटी, गोटेमाळ, शास्त्री चौक, सुंदर नगर या लोणंदच्या दक्षिणेकडील परिसराला मात्र बराचसा पाणी पुरवठा हा तांबवे धरणातून सरदेच्या ओढ्यातून होणाऱ्या विसर्गातून गोटेमाळावर असलेल्या टाक्यांच्या माध्यमातून होत असतो. यावर्षी अतिरिक्त प्रमाणात पाऊस पडला असल्यामुळे सरदेच्या ओढ्याला अद्यापही वाहते पाणी होते. पण उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागताच तांबवे धरणाची पाणी पातळी देखील हळूहळू कमी होत चालली आहे. त्यामुळे याचा परिणाम दक्षिण लोणंदच्या परिसरातील नागरिकांना होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर झाला होता. आज सकाळी तांबवे धरणातून लोणंद आणि कापडगाव यांची पाण्याची गरज भागवण्याच्या दृष्टीने तांबवे धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला गेला. कापडगाव सहीत लोणंदच्या मोठ्या भागातील लोकांना दोन महिने पुरेल एवढ्या प्रमाणात हा पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या पाण्यामुळे दक्षिण भागात राहणाऱ्या लोणंदकरांचा उन्हाळा सुसह्य होणार आहे.

यासाठी लोणंद नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष सचिन शेळके पाटील, उपनगराध्यक्ष किरण पवार व मुख्याधिकारी हेमंत ढोकले यांनी उन्हाळ्यातील पाण्याची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आधीपासूनच पाठपुरावा केल्याने लोणंदकरांना ऐन उन्हाळ्यात पाणी समस्येचा प्रश्न भेडसावणार नसल्याने दक्षिण लोणंद भागातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button