Nashik

बौध्दिक विकासासाठी विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षांकडे वळले पाहिजे ;  जि प सदस्या अमृता पवार यांचे प्रतिपादन

बौध्दिक विकासासाठी विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षांकडे वळले पाहिजे ; जि प सदस्या अमृता पवार यांचे प्रतिपादन

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन न थांबवता त्यात सातत्य ठेवले पाहिजे,मोबाईल हे दुधारी शस्त्र असून त्याचा योग्य विनियोग करून ऑनलाइन शिक्षण घेतले पाहिजे,विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षांकडे वळले पाहिजे असे सांगत त्यासाठी शिरवाडेच्या विद्यार्थ्यांना लागणारी पुस्तके मोफत देण्याचे आश्वासन देवगाव गटाच्या जि.प.सदस्या अमृताताई पवार यांनी दिले.
ग्रामपंचायत कर्मचारी मधुकर ठोंबरे यांनी वडील परशराम ठोंबरे यांच्या पुण्यस्मरणार्थ येथील इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वह्या,पेन,पेन्सिल समारंभपूर्वक वितरण कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक आवारे हे होते.याप्रसंगी कानळद सरपंच शांताराम जाधव,वीरेंद्र बडवर,सरपंच डॉ.श्रीकांत आवारे,भास्कर आवारे,गोरख शिंदे,किसन आवारे,माणिक आवारे,संदीप पाटील,गोरख आवारे,साहेबराव तनपुरे,शिवाजी आवारे,बाबासाहेब चिताळकर,सदाशिव धनराव,मुख्यध्यापिका अर्चना कदम,उपशिक्षक श्याम जाधव,वैभव कवडे,सोमनाथ मोगल,भाग्यश्री फणसे,चंद्रकांत ढिकले,कैलास पवार,बाळू घोटेकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब आवारे यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button