Rawer

निंभोरा येथे फुलला गुरुजन सोहळा , २६वर्षानंतर १०वी तील वर्गमित्रांच्या भेटीने आनंद.

निंभोरा येथे फुलला गुरुजन सोहळा ,
२६वर्षानंतर १०वी तील वर्गमित्रांच्या भेटीने आनंद

निंभोरा-संदिप कोळी

येथील न्यू इंग्लिश स्कुलच्या १९९६ च्या इयत्ता १०वी च्या विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन व गुरुपूजन सोहळा संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमा पूजनाने झाली .कार्यक्रमाला गुरुजन म्हणून ए एन चौधरी सर,ए एच वारके सर, पी के चौधरी सर व वसंत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती, शिक्षक ए एन चौधरी सरानी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होतो या बद्दल माहिती दिली. ए एच वारके सरानी सांगितले की प्रत्येकाने आपापली जबाबदारी स्वीकारून पुढे वाटचाल करावी तसेच शरीर हीच आपली संपत्ती आहे असे सांगितले तर पी के चौधरी सरांनी आपण आपले जीवन साहसाने जगा, कोणताही ताण घेऊन जगू नका ,जीवन हे एकदाच मिळते म्हणून भरभरून व आनंदाने जीवन जगा या जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही असे सांगितले.कार्यक्रमाला स्थानिक तसेच मुंबई,पुणे जळगाव,नाशिक,मध्यप्रदेश,गुजरात आदी शहरांतून सर्व वर्गमित्र उपस्थित होते. मुलींमध्ये रंजना भंगाळे,राजश्री भोगे,ज्योस्तना भंगाळे,तिलोत्तमा भंगाळे,सुषमा भंगाळे, कुमुदिनी पवार,दीपमाला पाटील,योगिता बऱ्हाटे, मृणालि बऱ्हाटे, कविता पाटील,कविता सोनवणे,ललिता सोनवणे,मनीषा कोळंबे,योगिता कोंडे,अर्चना भंगाळे तर मुलांमध्ये अरविंद दोडके,जितेंद्र सोनवणे, अतुल पाटील, प्रशांत पाटील,सुरेश भंगाळे,राजेंद्र चौधरी,विजय पाटील, महेश पवार,मनोज भंगाळे,धीरज भंगाळे,प्रवीण मनुचारी, चंद्रकांत शिंपी,सुनील कोंडे,मिलन कोंडे,राजेंद्र कोंडे,विजय बोंडे,भूषण भोगे,सुनील चौधरी,भरत कोळंबे,सचिन पाटील,हेमंत बऱ्हाटे इत्यादी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पाटील यांनी तर मनोज भंगाळे ,राजेंद्र कोंडे,सुनील कोंडे,रंजना भंगाळे,कुमुदिनी पवार यांनी आपली मनोगते व्यक्त केली.यावेळी उपस्थित सर्वांचे आभार मानून पुढील वर्षीही भेटीबद्दल चर्चा करण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button