Nashik

दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात पाच विद्यार्थ्यांच्या शस्रक्रिया

दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात पाच विद्यार्थ्यांच्या शस्रक्रिया

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व शिक्षण विभाग पंचायत समिती दिंडोरी यांचे संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालय दिंडोरी येथे पाच विद्यार्थ्यांच्या यशस्वी शस्रक्रिया करण्यात आल्या.

ग्रामीण रुग्णालयाचे वैदयकीय अधीक्षक डॉ विलास पाटील यांचे मार्गदर्शन खाली शस्रक्रिया शिबिराचे ग्रामीण रुग्णालय दिंडोरी येथे आयोजन करण्यात आले.आर बी एस के पथकाच्या वतीने शालेय आरोग्य तपासणी मध्ये संदर्भित विद्यार्थ्यांची शल्यचिकित्सक यांनी तपासणी करून पाच विद्यार्थ्यांची शस्रक्रिया करण्यासाठी निवड करण्यात आली.सिव्हिल हॉस्पिटल चे सर्जन डॉ बाबूलाल अग्रवाल, भुलरोगतज्ञ डॉ अमृता पोळ,डॉ देवीप्रसाद शिवदे ,डॉ विलास पाटील हे शस्रक्रिया प्रसंगी उपस्थित होते.चार विद्यार्थ्यांच्या टाळूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.या मध्ये जीभ टाळूला चिकटलेली असते त्यामुळे वाचदोष निर्माण होतो.बोलण्यात अडथळा निर्माण होतो परिणामी अध्ययन अध्यापन प्रक्रियेत विपरीत परिणाम होतो.त्यामुळे या विद्यार्थ्यांची शस्रक्रिया झाल्याने वाचदोष दूर होणार असून या विद्यार्थ्यांना स्पीच थेरेपी दिली जाणार आहे.एक विद्यार्थ्यांचे फायमोसिस ची शस्रक्रिया करण्यात आली.
या नंतर ग्रामीण रुग्णालयाचे वतीने डॉ अग्रवाल,डॉ पोळ,डॉ शिवदे यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी बी डी कनोज, विशेषतज्ञ ज्ञानेश्वर क्षीरसागर, डॉ समर्थ देशमुख,डॉ दीपक बागमर,डॉ समीर पाटील,डॉ तुषार पाटील,डॉ नितीन भडकवाड ,डॉ प्रशांत राऊत,डॉ सुचिता कोशिरे,डॉ प्रियंका भुजबळ,डॉ अश्विनी वाकचौरे, डॉ गौरी निराहली,डॉ सीमा गांगुर्डे आदी उपस्थित होते.

चौकट -डॉ विलास पाटील,वैदयकीय अधीक्षक
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावर उपचारासाठी अडचणी निर्माण होतात.त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी शस्रक्रिया करण्यासाठी तालुकास्तरावर शिबीर आयोजित करण्यात आले,दर महिन्याला शस्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात येणार आहे त्याचा विद्यार्थ्यांनि लाभ घ्यावा असे आवाहन डॉ पाटील यांनी केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button