Pandharpur

पंढरपूर महालक्ष्मी फर्निचर दुकानास आग लाखोंचे नुकसान आमदार समाधान आवताडे यांची घटनास्थळी भेट

पंढरपूर महालक्ष्मी फर्निचर दुकानास आग लाखोंचे नुकसान आमदार समाधान आवताडे यांची घटनास्थळी भेट

प्रतिनिधी
रफिक अत्तार

पंढरपूर- पंढरपूर लिंक रोड येथे असलेले दोशी काका यांच्या महालक्ष्मी फर्निचर दुकानास सोमवारी रात्री अचानक आग लागली आणि त्या आगी मध्ये पूर्ण दुकान जळून खाक झाले ही घटना कळताच लगेच मंगळवारी सकाळी पंढरपूर मंगळवेढ्याचे लोकप्रतिनिधी आमदार समाधान (दादा) आवताडे यांनी घटनास्थळी भेट दिली. व दुकानाचे मालक दोशी काका यांच्याबरोबर या घटनेसंदर्भात चर्चा करून पंढरपूरचे तहसीलदार यांच्याबरोबर फोनवर चर्चा करून नुकसान भरपाई बद्दल कार्यवाहीचे आदेश दिले.
या अचानक लागलेल्या आगीमुळे दुकानाचे प्रचंड नुकसान झाले आहे, या ठिकाणी आमदार आवताडे त्यांचे सोबत श्री.श्री.श्री.सदगुरू कारखान्याचे संचालक मोहन आप्पा बागल, हनुमंतराव शेळके, विनोद राज लटके, भैय्यासाहेब कळसे, अविनाश मोरे, संजय खडके व दोशी कुटुंबातील सर्व सदस्य,पंढरपूर जनसंपर्क कार्यालय विभागीय प्रमुख बालम मुलाणी घटनास्थळी उपस्थित होते, या महालक्ष्मी फर्निचर चे फार मोठे नुकसान झाले असून, या घटनेने या परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button