गिरगांव

फिरंगोजी शिंदे संस्थेतर्फे गिरगावात फराळ वाटप

फिरंगोजी शिंदे संस्थेतर्फे गिरगावात फराळ वाटप

प्रतिनिधी आनिल पाटील

गिरगाव गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार 2000 साली झाला होता . तेव्हापासून दरवर्षी तिथीप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींचा पारायण सोहळा आयोजित केला जातो. यावर्षीही पारायण सप्ताह सुरू आहे. पारायणासाठी बसलेल्या वाचकांना व भाविकांना क्रांतिवीर फिरंगोजी शिंदे संस्थेच्यावतीने फराळाचे वाटप करण्यात आले.
संस्थेच्या वतीने असे विविध उपक्रम राबवले जातात. यावर्षी संस्थेच्यावतीने शेकडो भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले यासाठी संस्थापक वस्ताद प्रमोद पाटील, प्रियांका पाटील , ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील, अनंतशांतीचे भगवान गुरव, दिलीप जाधव, नारायण जाधव, धोंडीराम पाटील(चोपदार), सुजाता जाधव, भगवान चव्हाण,संभाजी पाटील, दगदू जाधव उपस्थित होते. यासाठी क्रांतिवीर फिरंगोजी शिंदे मर्दानी आखाडा च्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

Leave a Reply

Back to top button