चंद्रपूर

बँक ऑफ इंडिया तर्फे वित्तीय साक्षरता कार्यक्रम

बँक ऑफ इंडिया तर्फे वित्तीय साक्षरता कार्यक्रम

राजेश सोनुने

बँक ऑफ इंडिया शाखा नेरी जि.चंद्रपूर यांच्या तर्फे ग्राम पंचायत वडसी ता.चिमूर येथे दिनांक 13 नोव्हेंबर 2019 रोज बुधवारला वडसी येथील पुरुष व बचत गटातील महिलां करीता वित्तीय साक्षरता कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला मा.एस.एन.झा साहेब, लीड मनेजर बँक ऑफ इंडिया चंद्रपूर, मा.जैन साहेब शाखा प्रबन्धक बँक ऑफ इंडिया नेरी, मा.मेश्रामजी सरपंच ग्रा.प.वडसी , मा.एम. शेंडे साहेब समनवयक बँक ऑफ इंडिया चंद्रपूर , मा. सोनकूसरे साहेब संचालक आरशेट्टी बँक ऑफ इंडिया चंद्रपूर, मा.पुरुषोत्तम वाळके अध्यक्ष किसान मित्र संस्था नेरी जि.चंद्रपूर ईत्यादी मान्यवर उपस्थित होते या वेळी बँकेच्या कर्जाच्या योजना, बचत गटांना कर्ज पुरवठा, थकीत कर्जाची परतफेड, शाषकिय विमा योजना, पेन्शन योजना, बँक खाते, ऑनलाईन बँकेचे व्यवहार, वित्तीय शाषरता, आरशेट्टी द्वारा 18 ते 45 वयोगटातील महिला, पुरुष, युवक , युवती यांना देण्यात येणारे मोफत प्रशिक्षण, ईत्यादी विषयावर मा.झा साहेब ,जैन साहेब ,शेंडे साहेब व सोनकूसरे यांनी मार्गदर्शन केले व गावकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यावा असे याप्रसंगी आवाहन करण्यात आले तसेच बीसी सचिन गोरडवार, योगेश कोड़ापे आणि वैभव कामडी हे सुध्दा उपस्थित होते या वेळी वडसी येथील ग्रा.प.सदयक्ष, पदाधिकारी व महिला व पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते. असे पत्रकांद्वारे पुरुषोत्तम वाळके यांनी कळविले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button